सत्याची वाटचाल चे संपादक श्री. गोविंद जोशी यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या कोकण सदस्य पदी निवड
आवाज कोकणचा / प्रतिनीधी
सत्याची वाटचाल या वृत्तपत्राचे संपादक व विभागांतील धडाडीचे पत्रकार श्री गोविंद जोशी यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या पनवेल शासकीय विश्राम गृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये समिति अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी कोकण सदस्य पदी नियुक्ती पत्र देवून निवड केली.
पत्रकार बांधवांना सहकार्याचा हात देत समाजात घडणाऱ्या विविध समस्यांवर काम करत अन्याय व अत्याचाराविरूद्ध नेहमीच आक्रमक असलेल्या पत्रकार उत्कर्ष समितीचे काम राज्यभरात जोमाने सुरू आहे.
समिती पत्रकारांसाठी तसेच सामाजिक भान ठेवत करत असलेल्या कार्याने प्रेरित होऊन या प्रवाहात सामील झाले आहेत.
याप्रसंगी समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील संघटक डॉन एन के के खजिनदार शैलेश ठाकूर सदस्य दिलीप गायकर सहसचिव ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
श्री. गोविंद जोशी यांच्या या निवडीने सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment