पत्रकार उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री सुनिल भोईर यांची निवड
आवाज कोकणचा / प्रतिनीधी
नवी मुंबई.
पत्रकार उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री सुनिल भोईर यांची निवड
पत्रकार उत्कर्ष समितीच्या पनवेल शासकीय विश्राम गृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये रायगड दर्पण या वृत्तपत्राचे संपादक पत्रकार श्री. सुनील भोईर यांची समिति अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी नियुक्ती पत्र देवून निवड केली.
पत्रकार बांधवांना सहकार्याचा हात देत समाजात घडणाऱ्या विविध समस्यांवर काम करत अन्याय व अत्याचाराविरूद्ध नेहमीच आक्रमक असलेल्या पत्रकार उत्कर्ष समितीचे काम राज्यभरात जोमाने सुरू आहे.
समिती पत्रकारांसाठी तसेच सामाजिक भान ठेवत करत असलेल्या कार्याने प्रेरित होऊन या प्रवाहात सामील झाले आहेत.
याप्रसंगी समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील संघटक डॉन एन के के खजिनदार शैलेश ठाकूर सदस्य दिलीप गायकर सहसचिव ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
श्री. सुनील भोईर यांच्या या निवडीने सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment