आवाज कोकणचा / प्रतिनीधी
आवज कोकणचा / प्रतिनिधि
महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग तर्फे शिवजयंती जल्लोषात साजरी...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग तर्फे शिवाजी चौक कणकवली येथे जल्लोषात साजरी करण्यात आली .
समितीच्या सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्षा सौ. ज्योतीका हरयाण यांच्यासह सदस्य व पदाधिकाऱ्यांनी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
त्यावेळी बोलताना सौ. हरयान म्हणाल्या की श्री छत्रपतींचे नाव घेऊन नाही तर त्यांचे गुण आणि विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत.
या कार्यक्रमासाठी महिला उत्कर्ष समिती जिल्हाध्यक्षा सौ.ज्योतिका हरयाण यांच्यासह सचिव सौ.सुप्रिया पाटील, सदस्या सौ.स्वरदा खांडेकर, सौ.दुर्वा मानकर,नेहा मानकर आणि इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment