हनुमान - शेवा कोळीवाड्यातील मच्छिमारांचे समुद्रमार्गे चॅनेल बंद आंदोलन पुनर्वसनाच्या बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा जेएनपीटीकडून शासनाने जमीन घेऊन शेतकऱ्यांना परत करावी.मा. लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश सन १९८२ ते १९८७ चे शासनाच्या मापदंडाचे मंजूर असलेले पुनर्वसन न करता विस्थापितांना गेली ४० वर्षे संक्रमण शिबिरात ठेवून अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या बनावट दस्तावेज तयार करून शेवा ( हनुमान ) कोळीवाडा गावातील विस्थापितांच्या मानवी जीविताचा छळ चालविलेला असल्याने अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करत नसल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी हक्काच्या मासेमारी परिसरात शेवा ( हनुमान ) कोळीवाड्यातील मच्छिमार ग्रामस्थ आपल्या कुटुंबासह " चॅनेल बंद आंदोलन " करणार आहेत. या आंदोलनाला समस्त आगरी, कोळी, मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी घेऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. समाजातील खासदार श्री. संजयभाऊ पाटील, खासदार श्री. सुरेशदादा ( बाळ्यामामा ) म्हात्रे, आगरी सेना प्रमुख श्री. राजाराम साळवी, आगरी समाज ने...
आवाज कोकणचा / पुणे लोणावळा / अशोक म्हात्रे आई एकविरा भक्तांना टोल माफी - एकविरा भक्त जयेंद्र दादा खुणे यांच्या प्रयत्नांना यश श्री एकविरा चैत्र यात्रानिमित्त पालखी प्रमुख व स्वयंसेवकांची नियोजन बैठक संपन्न.. _____________________ श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट आयोजित चैत्र सप्तमी गुरुवार दिनांक ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत देवींची यात्रा असून दिनांक ४ एप्रिल २०१४ रोजी देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न होणार आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आई एकविरा देवीची महती जगविख्यात असून आगरी, कोळी, सिकेपी व इतर समाजाची एकविरा देवी कुलस्वामिनी आहे . पालखीला व यात्रेला दरवर्षी लाखो भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात . श्री एकविरा देवीची यात्रा व पालखी सोहळा निमित्त चैत्र सप्तमी यात्रा व पालखीचे औचित्य साधून श्री. किशोर धुमाळ ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक ) यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जयेंद्रदादा खुणे ( अध्यक्ष श्री एकविरा देवी भक्त भाविक मंडळ, महाराष्ट्र राज्य ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी प्रमुख व स्वयंसेवकांची नियोजन बैठक लोणावळा पोलीस ठाणे येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्री. क...
आवाज कोकणचा / रायगड अलिबाग - बातमीदार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक VIII – 1982 बॅचचा अविस्मरणीय गेट-टुगेदर अलिबागमध्ये संपन्न अलिबाग राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक VIII मधील 1982 साली भरती झालेल्या जवानांनी आपली प्रदिर्घ सेवा पूर्ण करुन अधिकारी पदावर सेवानिवृत्त झालेले , तब्बल 43 वर्षे सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अलिबाग येथे एक अविस्मरणीय स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) नुकतेच साजरे केले. या कार्यक्रमाचे नियोजन अलिबाग दर्शन टीम यांच्या सहकार्याने रुक्मिणी कुंज रिसॉर्ट, सातीर्जे, बोंबटकरपाडा, अलिबाग येथे करण्यात आले होते. शांत आणि निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी एकमेकांना प्रेमाने मिठ्या मारून आपुलकीने भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. सदर कालावधीत दिवंगत झालेल्या एकूण 16 सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उपस्थितांनी शांततेत व आदराने उजाळा दिलाया स्नेहसंमेलनास 1982 बॅचचे विविध ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले एकूण 14 सेवानिवृत्त पोलीस अध...
Comments
Post a Comment