आवाज कोकणचा / प्रतिनीधी
महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा बैठक जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ओरोस येथे संपन्न
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची मीटिंग समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष ज्योतीका हरयान, कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे व वैभववाडी तालुका अध्यक्ष रश्मी रावराणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आले तसेच समितीच्या मागील अडीच वर्षातील कार्यावर चर्चा करण्यात येऊन लवकरच वेंगुर्ले दोडामार्ग व सावंतवाडी जिल्ह्यात समितीचे कार्य पोहोचवण्याचा मानस जिल्हाध्यक्ष ज्योतिका हरियाण यांनी व्यक्त केला.
यावेळी मालवण तालुका अध्यक्षपदी पल्लवी तारी, सचिवपदी समृद्धी धारी यांची व वैभववाडी सचिव पदी प्राजक्ता रावराणे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी स्वरदा खांडेकर , दूर्वा मानकर, तन्वी सावंत, रुपा वरक , दीप्ती चव्हाण, मनीषा त्रिभुवने, नेहा परब, लीनाक्षी कदम, अनिशा पेडणेकर, सरिता गाड, सुष्मिता राणे , सुप्रिया वालावलकर , स्वामिनी नाईक, समृद्धी धुरी, पल्लवी खानोलकर, नेहा कोळमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Comments
Post a Comment