आवाज कोकणचा / प्रतिनिधी
आज दिनांक (13 मार्च 2022) रोजी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे, बिना हेल्मेट, बिना लायसन तसेच रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करणे वाहतूक नियमाचे पालन करणेअशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना वाहतुकीचे नियम सांगून कारवाई करण्यात आली होती.
तसेच ही कारवाई उरण पालवी, राजपाल नाका, पेंशन पार्क,व उरण न्यायालयासमोरील परिसरात करण्यात आली होती. यावेळी ज्या दुकानांच्या समोर वाहने उभी राहतात त्यांना ती वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले आहेत, त्याच्या आत लावणे व सिंगल पार्किंग करावयास सांगावे असे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांच्याकडून दुकानदारास सूचना देण्यात आल्या.
तसेच जिथे पार्किंगचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत तेथेच आपली वाहने पार्किंग करावी नो पार्किंग मध्ये पार्किंग करू नये व अशा सूचना नागरिकांना यावेळी करण्यात आल्या त्यामुळे आज उरणमध्ये जी वाहतूक कोंडी होत आहे ती वाहतूक कोंडी होणार नाही व त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल असे सांगण्यात आले .यावेळी वाहतुकीचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक संजय पवार पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार काकडे पोलीस हवालदार मिल्के पोलीस हवालदार खिल्लारे पोलीस हवालदार बुधनवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment