आवाज कोकणचा / प्रतिनीधी 

राकेश देशमुख

सकल मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश तर्फे भव्य कब्बडी स्पर्धा



 जाणता राजा चषक व सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ चेआयोजन संस्थापक अध्यक्ष श्री अमरजी वाघ साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री आनंदजी सरवणकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री महेंद्रजी धामणसे साहेब यांच्या मार्गद्शनाखाली करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री अशोकजी धनावडे साहेब,महाड शहर पोलिस निरीक्षक श्री मिलिंदजी खोपडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री मनोजजी धामणसे साहेब, महाराष्ट्र युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य श्री विकासशेठ गोगावले साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री हनुमंतजी (नाना) जगताप साहेब, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्री बिपिनदादा म्हामुणकर साहेब, नगरसेवक श्री संदीप जाधव साहेब, समाजसेवक श्री प्रशांत मढवी साहेब, समाजसेवक श्री लादुलाल जैन साहेब,दिपक सावंत साहेब, श्री जयवंत दळवी साहेब, समाजसेवक राजेश येरुणकर, समाजसेवक इम्रान पठाण,सिध्देश पाटेकर साहेब, सुभाष मोरे साहेब, पत्रकार श्री महेश शिंदे साहेब, समाजसेवक प्रशांत मोरे,सिध्देश मोरे साहेब, जगदीश पवार साहेब,पवन नगरकर साहेब, नाना पोरे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.



यावेळी सामाजिक क्षेत्रात समाज प्रबोधन सारखे उल्लेखनीय कामगिरी करणारे हभप श्री महेश महाराज देशमुख (रायगड भूषण ) , श्री ज्ञानेश्वर महाराज शिंदे (रायगड भूषण ), श्री प्रसाद महाराज पानसरे (रायगड भूषण,) श्री पंढरीनाथ महाराज नाकते व श्री अक्षय दळवी साहेब,श्री व सौ. माधुरी मोरेश्वर धामणसे या मान्यवरांचे संघटने तर्फे समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कु.अवनीत विकासशेठ गोगावले,कु हर्षित महेंद्र धामणसे,कु.चंद्रकांत लोखंडे व सौ.प्रतिक्षाताई शिगवण (गायकवाड) या मान्यवरांचे संघटने तर्फे समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्री शैलेश सत्यवान कदम(MPSC ) यांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


सकल मराठा महासंघ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कब्बडी स्पर्धा जाणता राजा चषक चे प्रथम क्रमांक विजेताचे मान तानाजी मित्र मंडळ वेरखोरे या संघांनी पटकाविला द्वितीय क्रमांक विजेताचे मान शिवसाई सरेकर आळी, तृतीय क्रमांक जय बजरंग चोचिंदे, चतुर्थ क्रमांक स्वयंभू गावदेवी (कोटेश्वरी) महाड यांनी पटकाविले . उत्कृष्ट चठाई चा मान सुयोग सकपाळ, उत्कृष्ट पकड चार मान अनुज पवार,व उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनिकेत पवार यांना सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून श्री आदेश मोरे,बाबु मोरे,किरण जाधव, गणेश कंक, गणेश पाटील, अमर निवाते, कल्पेश वनगुळे,,प्रणित निकम, यांनी केले सुत्रसंचलन श्री प्रतिक माने, अवधूत जाधव,व अभिजित बागडे यांनी केले विजेता संघाचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री आनंदजी सरवणकर साहेब व महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री महेंद्रजी धामणसे साहेब यांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न सकल मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री मनोजजी धामणसे साहेब, कोकण अध्यक्ष श्री विनोदजी उतेकर उपाध्यक्ष श्री निलेशजीतलवटकर कोकण युवा अध्यक्ष श्री शिवाजी दरेकर,रायगड जिल्हा युवा अध्यक्ष श्री रोहीतजी गोविलकर राजि नियोजन समिती अध्यक्ष श्री कल्पेश म्हस्के, ,रा.जि.संर्पक प्रमुख श्री.गणेशजी पवार, उपाध्यक्ष श्री अशोक पार्टे, तालुका अध्यक्ष संतोष शेलार,रा जि.अध्यक्ष अजय सकपाळ, शहरं अध्यक्ष श्री सनी शेंडगे, तालुका संघटक अभिजित बागडे तालुका युवा अध्यक्ष प्रशांत जाधव, रा जि रोजगार समिती अध्यक्ष श्री चेतन पालांडे युवा संघटक श्री कमलेश पवार, दिपक साळुंखे, राजेश रेवणे,हरीश पवार व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.या भव्य कब्बडी स्पर्धचे जाणता राजा चषक चे अतिशय उत्कृष्ट असे नियोजन हे स्वयंभू क्रिडा मंडळ कोटेश्वरी महाड यांनी केले त्यांचे विशेष आभार संघटने तर्फे करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी संघटने ला कोणत्याही प्रकारे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानण्यात आले

Comments

Popular posts from this blog