आवाज कोकणचा / पनवेल
प्रतिनिधी
महिला उत्कर्ष समितीतर्फे रोड रोमियोंवर कारवाई करण्याची मागणी
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश संघटक सौ नीता माळी यांनी पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कादबाने यांची भेट घेऊन रोड रोमियोंवर कारवाई करण्याची मागणी केली
पनवेल येथील वडाला तलाव परिसरात नगरपालिकेतर्फे अत्यंत सुबक व नियोजनबद्ध असे उद्यान व सुशोभिकरण करून नागरिकांना त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी चांगला उपक्रम राबवून विकास कामे केली आहेत.
या तलावाच्या जवळच के. व्ही. कन्या विद्यालय व व्हीं. के. हायस्कूल अशा प्राचीन व महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. या परिसरात दररोज हजारो नागरिक येऊन आपले आरोग्य तंदुरुस्त रहावे याकरिता व फेरफटका मारण्यासाठी येत असतात परंतु अनेक वेळा शक्यतो शाळेच्या दुपारच्या सुट्टीच्या वेळेत काही समाजकंटक व युवक येथील शालेय विद्यार्थिनींना त्रास देण्याच्या व छेड काढण्याच्या उद्देशाने येऊन अश्लील चाळे करत शेरेबाजी करत . मोटरसायकल वर स्टंटबाजी व गाड्यांचे मोठ्या आवाजाच्या सायल्नसरणे आवाज करताना दिसत असल्याने तसेच रात्री बारा ते एक वाजे पर्यत तिथे मुला - मुलीचा सहज वावर असणे , बर्थ डे पार्टी सेलिब्रेशन , फटाके वाजवणे हे तर नित्याचेच झाले असल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांना तसेच वाटसरूना याचा नाहक त्रास होत होता. . तसेच येथून चालणाऱ्या महिला वर्गाला सुद्धा अनेक वेळा येथून चालणे जिकरीचे झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा छोटे-मोठे वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावासान भांडणात झालेले पहावयास मिळते. त्यामुळे जर याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउन किंवा एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासाठी सौ. नीता माळी यांनी आपल्या सहकारी सुहासिनी केकाने , अंजली इनामदार, चंचला बनकर, पुनम भोईर यांना घेऊन अशा समाज विघातक कृत्य करणाऱ्या घटकांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलून कारवाई करण्याची मागणी केली व त्यास वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. विजय कादमाने यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
Comments
Post a Comment