आवाज कोकणचा / ठाणे
प्रतिनिधि:
महिला उत्कर्ष समिती सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित प्रेरणा फाउंडेशन ने केला गौरव प्रदेश कार्याध्यक्ष सौ. श्रुति उरणकर यांनी स्वीकारला पुरस्कार...
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कार्याची दखल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्था घेत असून काल कल्याण येथे पार पडलेल्या एका शानदार समारंभात प्रेरणा फाउंडेशन या संस्थेने महिला उत्कर्ष समितीला गोरगरिबांचा आधार सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरव केला.
महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुती उरणकर यांच्यासह सौ. सविता ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आजपर्यंत महिला उत्कर्ष समिती महिलांसाठी करत असलेल्या एकूणच कार्य ज्यामध्ये सामाजिक बांधिलकी, महिलांवरील अन्याय, अत्याचार व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी केले जाणारे योग्य प्रयत्न , महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम या सगळ्याची दखल विविध क्षेत्रातून घेतली जात असल्यामुळेच आज समितीचे नाव महाराष्ट्रभर पसरले आहे.
समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरातून महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
Comments
Post a Comment