Skip to main content

 


कु.आर्या सुधीर पाटील राष्ट्रीय भाषारत्न पुरस्काराने सन्मानित



अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा परिचय परीक्षेत कु.आर्या सुधीर पाटील हिस राष्ट्रीय भाषारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदर स्पर्धा २२ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती.



आर्या सुधीर पाटील ही नवीन पनवेल तेथील सी.के.टी. विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही तिला निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा यामध्येही पुरस्कार मिळालेले आहेत.आर्या पाटील हिस मिळालेल्या या यशा बद्दल तिचे सी.के. टी.विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण,पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  तसेच पत्रकार उत्कर्ष समिती यास कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog