आवाज कोकणचा / प्रतिनीधी




महिला उत्कर्ष समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान




पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती रायगड , नवी मुंबई विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.



नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत न्हावा शेवा पोलीस ठाणे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सौ. रेखा घरत , नवी मुंबई अध्यक्ष सुजाता कडू , उरण तालुका अध्यक्षा निर्मला पाटील, सदस्य श्वेता तांडेल यांच्यासह इतर सदस्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथील महिला पोलिस कर्मचारी मानसी तांबोळी, देवयानी घरत, कनिष्का नाईक, स्वाती देशमुख, अश्विनी कांबळे, रोहिणी जाधव, जेनिफर जयराज, शुभांगी पाटील, संचीता म्हात्रे, सुप्रिया ठाकूर यांना समिती तर्फे सन्मानित करण्यात आले. 



यावेळी न्हावा शेवा पोलीस पोर्ट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ व त्यांचे सहकारी यांनी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध खेळांचे आयोजन केले होते. 






Comments

Popular posts from this blog