आवाज कोकणचा / सिंधुदूर्ग

ज्योतीका हरयान 

 महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अंध कुटुंबाला दिला मदतीचा हात 



 नियतीपुढे हतबल झालेल्या अंध भक्ती गुरूनाथ सामंत यांच्या पतीचे दिड महिन्यापूर्वी ह्रदयविकाराने निधन झाले.ते सुद्धा अंध होते.परंतू ते दिव्यांगांसाठी सामाजिक स्तरावर काम करत होते.परंतू पतीच्या निधनानंतर भक्ती यांच्यावर कुटूंबाची मोठी जबाबदारी येऊन पडली.भक्ती यांना गायत्री आणि गौरव अशी दोन मुले आहेत.मुलगी गायत्री हिला सुद्धा नीट दिसत नाही.त्याचबरोबर दिड वर्षांचा गौरव याची आजच्या स्थितीत  दृष्टी चांगली आहे परंतू त्याची खात्री डॉक्टर देत नाही आहेत.त्यामुळे मोठा दुःखाचा डोंगर भक्ती यांच्यावर कोसळला आहे.



हि गोष्ट महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांना समजताच ८ मार्च महिला दिनाचं औचित्य साधून महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्षा ज्योतिका हरयाण, कुडाळ तालुका अध्यक्षा दिपा ताटे, उपाध्यक्षा मनिषा त्रिभुवने, सचिव तन्वी सावंत, सदस्या सुश्मिता राणे यांनी भक्ती आणि त्यांच्या मुलांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करुन त्यांना आर्थिक हातभार तसेच मुलांना खाऊ देऊन एका निराधार महिलेला आधार देऊन महिला दिन साजरा केला




Comments

Popular posts from this blog