आवाज कोकणचा
उरण वार्ताहर पुजा चव्हाण
उरणच्या पोलीस ठाण्यात* *महत्त्वपूर्ण बैठक
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंती उत्सव सोहळ्यातील पालखी मिरवणूक काढण्यासंदर्भात काल 4 एप्रिल रोजी कोकण ज्ञानपीठ विद्यालय उरण येथे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व महिला कमिटीच्या सदस्या यांची बैठक घेण्यात आली होती. हनुमान जयंती उत्सव सोहळ्या संदर्भात घेण्यात आलेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना व माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणारी पालखी अथवा मिरवणूक ही दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या मार्गानेच काढण्यात यावी. तसेच ती वेळेतच पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर नमूद कार्यक्रमासाठी आवश्यक त्या विभागाच्या परवानग्या घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही सांगितले मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी अथवा मिरवणूकीच्या वेळी अक्षेपार्य पोस्टर बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय या बैठकीत उपस्थितांना आम्ही पिरकोन गावातील व्यक्तीने कमी पैशात जास्त प्रमाणात परतावा देण्याचे आमीष देऊन लोकांची फसवणूक केल्या बाबतची माहिती देखील यावेळी देण्यात आली.त्यामुळे आपापल्या गावात कोणी व्यक्तीने अथवा नातेवाईकांनी सदर व्यक्तीकडे पैसे दिले असतील तर त्यांनी सदर व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात अथवा माननीय न्यायालयात तक्रार द्यावी. जेणेकरून सदर व्यक्ती विरुद्ध कारवाई करणे सोयीचे होईल. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी पैशाची गुंतवणूक केली आहे त्यांना माननीय न्यायालयाच्या आदेशानवे पैसे परत देता येतील. तसेच आपापल्या गावात अथवा इतर कोणत्या गावात कोणी व्यक्तीने कमी पैशात जास्त प्रमाणात परतावा देण्याचे आमिष देत असल्यास त्याबाबत उरण पोलीस ठाण्यात माहिती देण्याबाबत सूचना देखील देण्यात आल्या.विशेष म्हणजे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अशाही सूचना देण्यात आल्या तसेच उपस्थित लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. सदर बैठकीसाठी उरण पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान जयंती उत्सव मंडळाचे पदाधीकरी, कार्यकर्ते यांच्यासह पोलीस पाटील शांतता मोहोल्ला व महिला कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सदरची बैठक सर्वांच्या सहकार्याने शांततेत पार पडली.
Comments
Post a Comment