आवाज कोकणचा / प्रतिनिधि
सिडको प्रशासनाचा अभिनव उपक्रम स्ट्रोम वाटर चॅनेलवरच बांधले शौचालय.
उरण पूजा चव्हाण
स्वतःला आधुनिक शहराचे शिल्पकार म्हणून घेणाऱ्या सिडकोने खासगी विकासकांच्या सौजन्याने प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के देण्यात आलेल्या भूखंडावर मौजे बोकडवीरा येथे द्रोणागिरी या नवीन स्मार्टसिटीची निर्मिती केली आहे.आजही दिवसा गणिक अनेक उत्तुंग इमारती या स्मार्ट सिटीची शोभा वाढवीत आहेत.मात्र शोभेला न शोभणाऱ्या अनेक अनधिकृत टपऱ्या,टूव्हीलर दुरुस्तीची गॅरेजेस, ट्रक-डंफरचे अनधिकृत पार्किंग,सिडकोच्या अतिक्रमण वीभागाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सौजन्याने साकारली आहेत.द्रोणागिरी नोड मध्ये अनधिकृत इमारती,घरे झोपडया,टपऱ्या, गॅरेज यांनी मोकळ्या जागा व्यापल्या असतानाच द्रोणागिरी स्मार्ट सिटीमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सौजन्याने द्रोणागिरी सेक्टर ४७ मधील प्लॉट नं.११ मध्ये असणाऱ्या अरमान टयूटोरियल क्लासच्या गाळ्या समोर चक्क स्ट्रोम वाटर चॅनेलवरच अनाधिकृतरीत्या शौचालयाची उभारणी केली असल्याने परिसरात चर्चेला मोठया प्रमणात उधाण आले आहे.
द्रोणागिरी मध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये पावसाळी पाणी व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी स्ट्रोम वाटर चॅनेलवरच(गटारे) बांधली आहेत व ती समुद्रात थेट जोडण्यात आलेल्या सेक्टर ४८-५० व ५१ मधील एस.डब्ल्यू.मुख्य चॅनेलला जोडली आहेत.संशोधना नंतर मानवी विष्ठेत अत्यंत घातक असणाऱ्या “इ-कोलायचे जिवाणू” मोठ्या प्रमाणात असत्तात त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शासकीय आरोग्य विभागाने बाहेर उघडयावर सौच करण्यास बंदी केली आहे आणि आढळून आल्यास त्याव्यक्तीवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे,सेफ्टीटँकसह घरही शौचालय बांधणे सक्तीचे केले आहे,प्रख्यात अभिनेते पद्मश्री अभिताभ बच्चनयांना या संदर्भांतील जाहिरातीचे ब्रँडअँबेसिडर बनऊन मोठया प्रमाणात जाहिरात केली आहे. एकंदरीत शासनाने मानवी विष्ठेत सापडणाऱ्या अत्यंत घातक “इ-कोलायचे जिवाणू” च्या दुष्परिणामाची चांगलीच दखल घेतली, परंतु सिडको प्रशासनाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण सौजन्याने द्रोणागिरी सेक्टर ४७ मधील प्लॉट नं.११ मध्ये असणाऱ्या अरमान टयूटोरियल क्लासच्या समोर सेक्टर ४७ हे स्ट्रोम वाटर चॅनेलवरच (गटारावर) हेसर्व नियम धाब्यावर बसून नियमांची पायमल्ली करीत हे शौचालय बांधले आहे. त्यामुळे जरी सिडको अधिकाऱ्यांच्या मासिक महसुलात भर पडत असली तरी नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
Comments
Post a Comment