आवाज कोकणचा / प्रतिनीधी
उरण चार फाटा येथे हायड्राच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू१२तासाच्या आता पोलिसांनी घेतला शोध.
उरण दिनांक १५एप्रिल २०२३ रोजी रात्रीच्या नऊ ते दहा च्या सुमारास उरण चार फाटा ओएनजीसी रोड येथे रस्त्यावर तरुणाचा हायड्राचा धक्का लागून मृत्यू झालेला होता. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नफिस मुनीच खान. वय वर्ष 19 असे असून तो उरण चार फाटा झोपडपट्टी येथे राहत होता.रात्रीच्या सुमारास नफिज हा रस्त्याच्या कडेला उभा असताना त्याला हायड्राने धक्का दिला, त्यामुळे नफिज हा रत्यावर पडला रत्यावर नफिज ला पाहताच त्याच्या मित्राने त्याला उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय घेऊन आले. त्या वेळी नफिज यांनी डॉक्टरांना मला हायड्राने धक्का दिला असे सांगितले. नंतर उपचार दरम्यान नफिज याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले या सर्व घटनेची माहिती घेतल्यावर पोलिसांनी त्वरित याचा तपास करायला सुरुवात केली. तपास करताना सीसीटीव्ही फुटेज द्वारा बारा तासाच्या आत मध्ये पोलिसांनी या हायड्राचा शोध घेतलेला असून पुढील कारवाई उरण पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून सुरू आहे.
Comments
Post a Comment