आदर्श शिक्षक श्री संजय होळकर हे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित*
**आदर्श शिक्षक श्री संजय होळकर हे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित*
प्रतिनिधी/आवाज कोकणचा/राजेंद्र होळकर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश व नवी मुंबई जिल्हा आयोजित सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई ता.उरण या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रा.जि.प जिल्हा आदर्श शिक्षक श्री संजय होळकर सर यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून मा. श्री. शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तसेच राजश्री बोहरा संमेलन अध्यक्षा, श्री स्वीकृत खांडेकर संपादक दैनिक प्रहार ,डॉक्टर राम नेमाडे प्रसिद्ध साहित्यिक आदि मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवर व साहित्यिकांचे ढोल,लेझीमच्या वादनाने पुष्पवृष्टी छान पद्धतीने मनपा मराठी शाळा गोवंडीच्या मुलांनी केले.तसेच पेटीवर सुंदर ईशस्तवन व स्वागतगीत सादरीकरणाने व सावित्रीबाई व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर साहित्यिक,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या यथोचित सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पुढे परिसंवाद व राज्यातील विविध कविवर्य आपापल्या स्वलिखित कविता सादरीकरण झाले.
श्री.संजय होळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मा.श्री.जयदेव कालापाड साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त चेंबूर, मा.श्री.संतोष कालापहाड सर मुंबई पोलीस मा.श्री.दिनेश शिंदे अध्यक्ष नवीमुंबई, कल्याण GSM टीम, नवीमुंबई GSM टीम,नायगाव गोपाळ समाज अध्यक्ष मा.श्री.भागोजी साबळे,मा.श्री. विजय होळकर ,मा.श्री.संजय होळकर,को.म.सा.प.उरण मार्गदर्शक श्री.अरूण म्हात्रे व होळकर परिवार आवर्जून उपस्थित होते.श्री.संजय होळकर सर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच त्याच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षकवृंद,ग्रामस्थ याच्यांसह विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment