आवाज कोकणचा 
चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. 


उरण:- ( प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून )
उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे चाणजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अमित भगत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा उरण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सदर प्रकरणी आरोपी अमित भगत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे समजते.



सरपंच अमित भगत यांनी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अमित भगत यांच्यावर ३५३ व ३५४A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित भगत यास न्यायालयात उभे केले असता जामीनावर सुटका करण्याच्या आदेश न्यायालयाने दिले होते. गुन्हा दाखल झालेले अमित भगत हे चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच असून ते उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आहेत या गंभीर गुन्हा मुळे अमित भगत यांची व त्यांच्या पक्षाची ही नाचक्की झाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये प्रथम नागरिक समजला जाणारा सरपंच जर महिलांच्या अब्रूला हात घालित असेल तर ग्रामपंचायत मधील आया बहिणीचे अब्रू सुरक्षित नसल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.सरपंच अमित भगत यांच्यावर या अगोदर ग्रामपंचायत भ्रष्टाचार, बोगस घर दाखवून २५ लाखाची बँक लोन असे इतर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर करण्यात आलेली तडीपातिची प्रक्रिया राजकीय दबाव पोटी प्रलंबित आहे. तरी सदर प्रकरणात सरपंच महोदय हे प्रत्येक वेळी शासकीय अधिकाऱ्यांना तेरे भीचूप और मेरी भी चूप अशी गोष्ट सांगत असल्याने त्यांच्यावर आद्यप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी सरपंच अमित भगत यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे सरपंच पद त्वरित रद्द करावे असे मागणी तक्रारदारांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog