
आवाज कोकणचा / प्रतिनिधि
प्रकाश बाडकर
माहीम येथे श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक महामंडळ मुंबई स्थित गजानन महाराजांच्या प्रसिद्ध ध्यान मंदिराच्या परिसरात गजानन वाडेकर गार्डनमध्ये महाराजांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना उत्सव नुकताच माहीम परिसरातील भाविकांच्या उपस्थित पार पडला.
भारताचार्य धर्मभूषण आणि जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ कीर्तनकार श्री सु. ग्र . शेवडे यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बैठी सुबक सुंदर महाराजांची पाच फुटी मूर्ती ही महाराजांचे भक्त श्री व सौ तन्वी चेंबूरकर मालाड यांनी संपूर्णतः भक्तांसाठी मनोभावे उपलब्ध करून दिली व त्याची पूजा करून स्थापना करण्यात आली आहे. सदर सोहळ्यास विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती विजया मुजुमदार , प्रवीण राणे यांच्यासह परिवारातील महाराजांवर प्रेम करणारे नागरिक व भाविक भक्तगण उपस्थित होते.
भारताचार्य सुरेशजी शेवडे यांच्या हस्ते श्री व सौ. तन्वी परिवाराचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी तन-मन-धनाने श्रींचे घ्यावे दर्शन !
तेणे होईल आनंद !
मन करावे प्रसन्न ! भक्ताचीये कारणे !!
Comments
Post a Comment