आवाज कोकणचा / प्रतिनीधी
शेतकरी उत्पादक कंपनी मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
सिरसम हे गाव बालाघाट पठारामध्ये वसलेले असून येथील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पादन सोयाबीन,तूर,हरभरा,जवारी,बाजरी इत्यादी पिके घेतात. सदर सिरसम व इतर जवळील सर्व गाव गावात जमीन सुपीक नसतानाही शेतकरी अत्यंत मेहनतीतून प्रयत्न करून उत्पादन करतात,परंतु त्यांना योग्य भाव मिळत नव्हता त्यामुळे तुकाराम नारायणराव पाटील माजी सरपंच सिरसम यांनी आत्मा कार्यालय परभणी यांच्याशी संपर्क साधून समूह शेती मधून वीस गट तयार करून 580 शेतकरी सभासद त्यात नोंदणी करून तांदुळवाडी पंचायत समिती सर्कल मधील सिरसम,चोरवड,भालकुडकी,उक्कडगाव,पोखरणी,तांदुळवाडी,डोंगरगाव,मोजमाबाद इत्यादी गावांच्या गावातील लोकांशी वारंवार बैठकी लावून कृषी विभागातील कर्मचाऱ्याला बोलावून शेतकऱ्यांना समजावून सांगून व माहिती देऊन टी एन पाटील शेतकरी उत्पादक कंपनी 20 गट तयार करून तयार करण्यात आली.ती कंपनी सन 2015 पासून स्थापन होऊन आज पर्यंत चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. या परिसरातील सदरील कंपनीमुळे शासकीय हमीभाव केंद्र मंजूर झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे खरेदी शासन हमीभावात केल्या गेल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना कुंटली हजार रुपयाचा फायदा झाला आहे.त्यामुळे शासनाच्या वतीने चालना देणारे हमीभाव खरेदी केंद्र खरेदी ही दरवर्षी वाढत चाललेली आहे. तसेच त्या खरेदी केंद्रामुळे सर्व शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढवत आहेत.शेतात कारण त्यांना हमीभाव खरेदी केंद्र तिथे योग्य भावात शासनाने ठरवून दिलेल्या भावात खरेदी करत आहे.
तसेच या कंपनीमार्फत निविष्ठा खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे.त्यात प्रथम वर्षी सर्व प्रकारचे रासायनिक,ऑरगॅनिक, जैविक व पारंपरिक खते विकली जातात. तसेच बी बी बियाणे व रासायनिक औषधे, ऑरगॅनिक, जैविक ,पारंपारिक औषधे फवारण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. तसेच या कंपनीस स्मार्ट योजनेतून गोडाऊन बांधकाम पुढच्या वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. या कंपनीस या मार्चमध्ये जैविक प्रयोशाळा मंजूर करण्यात आली असून १०० एकर जमीन ही जैवक व पारंपरिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर कमी करून उत्पन्न घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा समूह शेतीतून प्रगतशील शेतकरी घडवण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.
संपर्क:-तुकाराम नारायणराव पाटील
टी एन पाटील ऍग्रो प्रोडूसर कंपनी सिरसम तालुका पालम जिल्हा परभणी
मोबाईल नंबर:- ९४०४७३८२२६
ई-मेल:- patilagro2015@gmail.com
Comments
Post a Comment