चोरीचोरी चुपके चुपके सिडकोची अशी ही बनवा बनवी
सिडकोच्या वतीने उरण पनवेल महामार्गावरसह द्रोणागिरी शहरात मृत्यूचा सापळा
उरण/पूजा चव्हाण
उरण पनवेल महामार्गावरसह द्रोणागिरी शहरात मृत्यूचा सापळा सिडकोच्या वतीने लावण्यात आला असून उरण द्रोणागिरी सेक्टर 15 मधील फुंडे गवाच्या कर्ल्व्हटवरील आर.सी.सी.स्लॅब कोसळून 14 मार्च 2021 रोजी दीपक कासुकर नावाच्या 30 वर्ष वयाच्या तरुणाचा नाहक बळी घेतल्या नंतर सिडकोने तातडीने दख्खल घेऊन सदरच्या याच मार्गावील बोकडवीरा सिडको कार्यालया जवळील बॉक्स कर्ल्व्हटच्या स्ट्रक्चरल ऑडिट सह द्रोणागिरी नोड मधील सर्वच बॉक्स कर्ल्व्हटचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते.
यानंतर सिडकोने द्रोणागिरी शहरांतील सेक्टर 52 मध्ये असणाऱ्या बॉक्स कर्ल्व्हटच्या दुरुस्तीचे काम वेगात सुरु केले असून दुरुस्ती सुरु असलेल्या बॉक्स कर्ल्व्हटवरून मात्र राजरोस पणे अवजड वहानांसह एस.टी.बस व एन एम.एम,टी.बस वाहतूक सुरु आहे.या बॉक्स कर्ल्व्हटच्या खाली दुरुस्तीसाठी लोखंडी पाईप टेकू लावण्यात आले असून जर यांतील एकदा पाईप जरी कोलमडला तरी मोठा अपघात होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही परंतु वरून वाहतूक आणि खालून सुरु असणाऱ्या चोरीचोरी चुपके चुपके दुरुस्ती मुळे सिडकोची अशी ही बनवा बनवी येथून राजरोस पणे सुरु असणाऱ्या वाहतूकीस धोका दायक आहे, मात्र या ठिकाणी विकासकांच्या सोई साठी ही वाहतूक या बॉक्स कर्ल्व्हटवरून सुरळीतपणे सुरु ठेवण्यात आली आहे, मात्र उरण पनवेल मार्गावरील वाहतूक मात्र बंद करण्यात आली आहे .त्यामुळे नागरिकान मध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
उरण-पनवेल मार्गावरील बॉक्स कर्ल्व्हट हा अवजड वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता व तसा आदेशाचा फलक या बॉक्स कर्ल्व्हटवर लावण्यात येऊन या मर्गावर हाईटगेजची उभारणी करून हा मार्ग एस.टी.,एन.एम.एम.टी प्रवासी वाहानांसह अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.आणि या मार्गावरील ही सर्व प्रकारची अवजड वाहतूक द्रोणागिरी शहराच्या मार्गे भेंडखळ,नवघर,मार्गे उड्डाण पूलावरून वीर वाजेकर विद्यालय जवळ उरण-पनवेल महामार्गावर जोडण्यात आली आहे.असे असले तरीही द्रोणागिरी शहरांतून सुरळीतपणे सुरु असणारी वाहतूक आत्ता थेट स्वर्गात जाण्याचा महामर्ग बनला आहे, या ठिकाणी भविष्यात केंव्हाही आणि कधीही अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
14 मार्च 2021 रोजीउरण जुने शेवा मार्गावरील नाल्यावरील फुंडे गावा जवळील बॉक्स कर्ल्व्हट कोसळून झालेल्या अपघातामध्ये दीपक कासुरकर वय वर्ष 30 या तरुणाचा नाहक बळी गेल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने द्रोणागिरी सिडको कार्यालयाजवळील बॉक्स कर्ल्व्हटचे स्टक्चरल ऑडीट करून सदरचा बॉक्स कर्ल्व्हट अवजड वाहनासाठी बंद केला आहे. द्रोणागिरी शहरांतून वळविण्यात आली असली तरी आत्ता ही सर्व वाहतूक सिडको अभियंत्याच्या अर्थपूर्ण कृपे मुळे धोकादायक बनली आहे या मार्गावरून खरे तर प्रवास करणाऱ्या एका ही नागरिकाला आपण साक्षात यमराज्याच्या प्रवेश दारावरून प्रवास करीत आहोत याच कोणतीच कल्पना नाही,आणि नियमितपणे ठेकेदाराबरोबर अर्थपूर्ण मेत्री साधणाऱ्या सिडकोच्या अभियंत्यांनी ठीकठिकाणी लावलेल्या मृत्यूच्या सापळ्याची पूर्व कल्पना नगरीकांना दिलेली नाही.त्यामुळे रोज या मार्गावरून हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.ते आपल्या जबाबदारी वरच.
द्रोणागिरी शहरात सन 1993 ते 1998 या काळात सेक्टर 49, 50 आणि 52 सेक्टरमध्ये बांधण्यात आलेले स्ट्रोम वाटर चॅनेलवरील आर.सीसी परिस्थिती भयाण झाली असून सडलेल्या लोखंडी सळयाना केमिकल लाऊन मयाक्रोसिमेंटच्या लेपाने जॅकटींग करण्यात येत आहे. या साठी बॉक्स कर्ल्व्हट पूर्णपणे हॉमरींग मशिने फोडून ठिगळ लावण्याचे कामसुरु केले आहे. या सठी बॉक्स कर्ल्व्हटला हॉमरींग करून जागोजागी लोखंडाचे पाईपलाऊन टेकू देण्यात आले आहेत खालून मशीनने चरते पांच कामगार हे काम करीत असून टेकूवर आधारित असलेल्या या बॉक्स कर्ल्व्हट वरून सर्वच अवजड वाहने धावत आहेत.यांतील एक टेकू जरी कोलमडला तरी मोठा अपघात होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही, हा बॉक्स कर्ल्व्हट कोसळून दीपक सुकर प्रमाणे आणखीन कुणाचा बळी घेणार या घटने कडे बॉक्स कर्ल्व्हट वरून प्रवास करणारे प्रवासी आपल्या अपघाती मृत्यूची वाट पहात असताना सुद्धा तालुक्यांतील या परिसरांतील एकाही ग्रामपंचायतीच्या सरपंचाला, पंच्यायत समितीच्या सभापती ते सदस्याला खासदारापसून आजी-माजीआमदाराला अनेक समाजिक हित जपणाऱ्या संस्थाना त्याचे सोयर-सुतक नाहीहेच उरणकरांचे दुर्देव आहे.
Comments
Post a Comment