आवाज कोकणचा / प्रतिनिधी
शैलेश ठाकूर / नवी मुंबई
पंडित धायगुडे करणार नवीन विश्वविक्रम 257 किलो वजनाच्या पाच बाईक दीडशे वेळा नेणार पोटावरून..
पंडित धायगुडे या ध्येयवेढ्या इसमाने या अगोदर 257 किलोच्या दोन बाईक 121 वेळा पोटावरून नेऊन गिनिज बुकमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली आहे .
स्वतःचाच विक्रम मोडीत काढून आणखी एक नवीन विश्वविक्रम करण्यासाठी पंडित धायगुडे सज्ज आहेत. रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे मैदानात 257 किलो वजनाच्या पाच बाईक दीडशे वेळा पोटावरून नेऊन नवीन विश्व विक्रम प्रस्थापित करणार आहेत.
धायगुडे चार वेळा ब्लॅक बेल्ट असून त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
मूळचे सांगलीचे असलेले पंडित धायगुडे सध्या नोकरीनिमित्त नवी मुंबईत वास्तव्यास आहेत
Comments
Post a Comment