वैद्यकीय व्यवसायकांना आकारण्यात येणारा परवाना शुल्क रद्द करावा - डॉ. वैभव मोकल
वैद्यकीय व्यवसायकांना आकारण्यात येणारा परवाना शुल्क रद्द करावा - डॉ. वैभव मोकल
प्रतिनिधी/आवाज कोकणचा/आरती पाटील
पनवेल महानगरपालिकेकडून वैद्यकीय व्यावसायिकांना परवाना शुल्क या संदर्भात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या त्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल डॉक्टर जनरल प्रक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल व पदाधिकारी हे महापालिकेत व्यवसाय परवाना शुल्का बाबतीत विचारणा करण्यासाठी गेले. पनवेल महानगरपालिकेत कडून श्री हरिश्चंद्र कडू, करविभाग अधिकारी आणि श्री जयराम पादीर अधिक्षक यांनी आपल्या काही वैद्यकीय व्यावसायि काना नोटीस दिली होती त्याच संदर्भात यांची भेट घेतली व चर्चा केली.त्यांनी व्यवसाय परवाना शुल्काबाबत माहीती दिली. ते फक्त कायदेशीर पद्धत अनुसरूनच सदर नोटीस काढली आहे असे सांगण्यात आले.
त्यावर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांनी व्यवसाय परवाना शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी केली.
असोसिएशन तर्फे महापालिकेत संदर्भीत उपायुक्त साहेब यांना
सदर व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येऊ नये असे निवेदन देण्यात आले.यावेळेस अध्यक्ष डाॅ वैभव मोकल, सचिव डॉ राऊत,डॉ बहाडकर , डॉ. गांधी, डॉ सिलीमकर, डॉ सागर ,डॉ पटेल तसेच महिला प्रतिनिधी डॉ शीतल याही उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment