आवाज कोकणचा / उरण प्रतिनिधी
बेशिस्त वाहनचालकांना हिसका, उरण वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई.
उरण ( प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून)
उरण दिनांक.४ मे २०२३ रोजी उरण मध्ये उरण वाहतूक शाखा अंतर्गत उरण चारफाटा ते राजपाल नाका व वैष्णवी हॉटेल या भागात नो पार्कींग तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे ,विना हेल्मेट अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून उरण मध्ये नो पार्कींग चे फलक लावून देखील नागरिक पार्कींग करत असल्याने तसेच रस्त्यावर पांढरे पटीच्या आत वाहने लावण्याचे आदेश असून देखील रस्त्यावर बेशिस्त पार्कींग करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे .
त्यामुळे आज उरण वाहतूक शाखे कडून वाहतूक कोंडी होऊ नये .व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
या साठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मध्ये नो पार्कींग ची कारवाई - १२५, विना हेल्मेट - १०२, सर्व एकूण कारवाई - २३८ या केसेसचा एकूण दंड - १,७७,४०० /- एवढा वसूल केला आहे
या कारवाई वेळी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड , व इतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment