आवाज कोकणचा / प्रतिनीधी
पुजा चव्हाण - उरण
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे.
उरण दिनांक ५ मे २०२३ एन एस पी टी प्रकल्प विस्थापित शेवा (हनुमान) कोळीवाडा गावाचा दस्ताऐवज शासनाने ग्रामपंचायतला दिला नसल्याने ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयाला हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी टाळे ठोकले आहे . रायगड जिल्ह्यात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला टाळे ठोकणे ही घटना पहिलीच असल्याची चर्चा उरण तालुक्यात सुरू आहे.
हनुमान कोळीवाडा गावातील भूखंडधारक शेतकरी ८६ व बिगर शेतकरी १७० मिळून २५६ कुटुंब यांच्या यादीसह एकूण १७ हेक्टर जमिनीचा मौजे हनुमान कोळीवाडा गाव वहिवाट नकाशा व आकार बंद आणि गाव नमुना नंबर ७/१२ वर भोगावठादार नोंद करून नवीन ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना शासनाने दस्ताऐवज दिलेला होता असे असताना ग्रामस्थ रमेश भास्कर कोळी यांनी दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेल्या माहिती अनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत मध्ये मागितलेल्या वरील नमूद दस्ताऐवज उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांनी माहिती अधिकारात मागितलेल्या पत्राला लेखी उत्तर दिले आहे. एक्झिबिट-ए दस्तावेजाच्या पुराव्यावरून ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ही कायदेशीर नसल्याचे सिद्ध केले असल्याने मुळातच गेली ४०वर्षे पुनर्वसनाच्या शोधात असलेल्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून उद्रेगाचा संयम तुटल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला २७ एप्रिल २०२३ रोजी टाळे ठोकले आहे.
यासंदर्भात ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा यांनी एन,एस, टी ,पी प्रकल्प विस्थापित शेवा (हनुमान)कोळीवाडा गावाचा शासनाने दस्ताऐवज ग्रामपंचायतीला दिल्या नसल्याने ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा याचे कामकाज बंद करण्याचे मागणी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर उरणचे गटविकास अधिकारी यांनी सागरी पोलीस ठाणे मोरा येथे तक्रार नोंदवली असून याबाबत ग्रामस्थ मंगेश अनंत कोळी, नितीन महादेव कोळी, वनिता शरद कोळी, व उज्वला रमेश कोळी यांच्यावर १मे २०२३ रोजी गुन्हा नोंदणी क्रमांक ०३/२०२३ भादंवि कलम ३५३, ३४१, व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे वरील सर्व आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४१ (अ) (१) अन्वये आरोपींना हजर राहण्याचे समाजपत्र मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एम.मोहिते. यांच्यामार्फत तपास अमलदार सागर धुमाळ यांनी बजावलेली आहे.
Comments
Post a Comment