आदित्य वृध्दाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" महड (खालापूर) यांची वाटचाल यशस्वी पूर्ण


"आदित्य वृध्दाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" महड (खालापूर) यांची वाटचाल यशस्वी पूर्ण !





पनवेल /आवाज कोकणचा/ अशोक घरत


०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून खालापूर महाड (देवस्थान) गावच्या "आदित्य वृद्धाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" येथे काही कामानिमित्त भर दुपारी जाण्याचा योग आला होता.ग्रुप ग्रामपंचायत कोन कमिटीचे सरपंच श्री.दीपक धा.म्हात्रे,जितेश बा.शिसवे (सदस्य),घन:श्याम पाटील(सदस्य),सौ.आशा अ.घरत(सदस्या) आणि अशोक ना.घरत (पत्रकार) या सर्वांच्या सोबतीने त्या वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली.


वृद्धाश्रमाचे प्रमुख डॉ.धर्मेंद्र मारुती जावळे राहणार खोपोली यांनी वृद्धाश्रम कार्यालयाच्या ऑफिसमध्ये आम्हा साऱ्यांना नेऊन आमचे यथोचित स्वागत केले व नंतर काही वेळाने आम्हांला सोबत घेवून तेथील वृद्धाश्रमाबद्दल संपूर्ण माहिती देताना, त्या वृद्धाश्रमात राहत असणाऱ्या सर्व वृद्ध स्त्री-पुरुष यांच्याबरोबर ओळख करून दिली.आम्ही साऱ्यांनी तेथील वृद्धांशी गोड संवाद साधून त्यांचे आशीर्वादही घेतले.


वृद्धाश्रमातील व्यवस्थापन अतिशय छान आणि सुंदरसे,तितकेच कौतुकास्पद पाहून मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. वृद्धाश्रमातील माणसांच्या चेहऱ्यावरती जणू काही खूप सारा आनंद ओसंडून वाहत होता.तेथील सारे  वृद्ध आणि त्यांचे सेवेकरी मंडळी,आम्हां साऱ्यांना आनंदी दिसून आली.


मी पत्रकार म्हणून डॉ.धर्मेंद्र मारुती जावळे रा.खोपोली यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून तेथील "आदित्य वृद्धाश्रम आणि हेल्थकेअर सेंटर" बांधण्यामागचा हेतू व त्यांच्या मनातील संकल्पना व उद्देश जाणून घेतला,त्याची सविस्तर माहिती मी आपणास देत आहे.


"आदित्य वृद्धाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" खालापूर (महड) चे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र मारुती जावळे रा. खोपोली.त्यांचे सध्याचे वास्तव्य नवीन पनवेल येथे आहे.

"आदित्य वृध्दाश्रम अणि  हेल्थ केअर सेंटर" बांधणी मागचा हेतू असा आहे. त्यांना एक मतिमंद मुलगा आहे.त्याचे नाव आदित्य आहे.तो मुलगा जन्माला आला तेंव्हा पासून आता पर्यंत त्याचे वय वर्षे 18 आहे.या 18 वर्षांत खऱ्या अर्थानं जीवनात प्रगती होत गेली.आदित्य १५ वर्षाचा होता,तो पर्यंत त्याला त्याचे आई-वडील डॉ. म्हणून स्वतः त्याचा घरीच सांभाळ करत होते.पण त्याचे वजन ४० कि.ग्रॅम च्या वर झाले,तेव्हा त्याला घरी सांभाळणे मात्र अवघड झाले.कारण त्याला उठता,बसता आणि चालता येत नसल्याकारणाने सगळ्याच विधी चा भार आई-वडील म्हणून त्यांच्यावर येऊन पडला.घरात आणि घराबाहेर काम करणं त्यांना आई वडील म्हणून अवघड होऊन बसले होते.


एक सज्ञान आणि चांगले पालक म्हणून त्यांच्या मनामध्ये विचार आला की त्याला बाहेर वृध्दाश्रमात ठेवावे.परंतु त्यांचे मन काही तयार होत नव्हते,कारण त्याला तहान,भूक तसेच त्याच्या शरीराची स्वच्छता करण्याविषयीचे,कोणत्याच गोष्टीचे ज्ञान त्याला नसल्याने मनामध्ये विचार आला की हे पाप आपल्याला लागेल.मग आता करायचे काय ? असा प्रश्न त्या जन्मदात्या आई वडिलांना पडला.पण एक आहे कोणतीही अडचण आली की मार्ग मात्र सापडतो,अगदी तसेच झाले.एके दिवशी त्यांच्या मनात विचार आला की स्वतःचे वृध्दाश्रम टाकले तर....!

असा विचार आदित्य चे पालक डॉ. धर्मेंद्र मारुती जावळे व त्यांचे मित्र श्री.सुभाष पाटील (अप्पा) रा.आडोशी अणि त्यांचा मुलगा श्री.किरण पाटील (दादा) यांना त्यांनी बोलून दाखवला.त्या सर्वांनी त्या चांगल्या गोष्टीला लगेचच होकार दिला आणि काही अडचण आली तर आम्ही सोडवू,असे छानशे आश्वासनही दिले.

मग त्या दोघां पालकांनी मिळून एक "आदित्य वृद्धाश्रम आणि हेल्थकेअर सेंटर" ट्रस्टची स्थापन केली.


सुरुवातीला त्या दोघांनी महड ता.खालापूर येथे एक बंगला रेंट बेसिसवर घेतला.त्यावेळी त्यांच्याकडे फक्त त्यांचाच आदित्य नावाचं मुलगा हा एकटाच होता.नंतर दुसऱ्या आठवड्यात आणखी तिघे आले.

पण असे म्हणतात,जेंव्हा चागला विचार अंमलात आणला की परमेश्वर सुद्धा त्याची दखल घेतो.याची प्रचिती त्यांना लगेचच आली.त्याच प्रमाणे त्यांच्या बाबतीत सुद्धा असेच घडले,आणि नेमके त्याच वेळेस आपल्या भारत देशामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता अणि ज्याचा बंगला रेंट बेसिसवर घेतला होता,त्यांनी तो खाली करायला सांगितला.आता मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला की या चार लोकांना घेऊन कुठे राहायचे ? कारण दुसरा बंगला घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती या डॉ.जावळे दाम्पत्यांची नव्हती.समोर आलेली सर्व परिस्थिती परमेश्वर हे वरून पाहत होता.


त्याचवेळी कोरोना आपल्या राज्यामध्ये झपाट्याने वाढत होता.अशा परिस्थितीतही त्या वेळी एक डॉक्टर म्हणून त्यांनी रुग्ण सेवाही मनापासून केली आणि त्या बदल्यात त्यांना ४ गुंठे जागा मिळवून "आदित्य वृध्दाश्रम आणि हेल्थ केअर सेंटर" बांधून तयार केले.


आज या छान आणि सुंदरश्या महड गावच्या आदित्य वृद्धाश्रमात १३ माणसे राहतात.विशेष म्हणजे गेली ४ वर्ष सतत येथील असणाऱ्या वृद्धांची सेवा ही निरंतर चालू आहे.हे सर्व कसे घडत गेले,असे विचारले असता,याचे उत्तर आमच्याकडे नाही.वर आभाळाकडे पाहून हसत मुखाने म्हणाले....आपण सारे कठपुतली आहोत."कर्ता करविता" तोच आहे.

परमेश्वर कृपने आज त्या डॉ.जावळेंचे २० खाटांचे "आदित्य वृध्दाश्रम" जो उभा आहे,ही सर्व परमेश्वराचीच कृपा आहे,असे त्या डॉक्टरी दांपत्यास मनोमनी वाटत आह


संपर्कासाठी :

आदित्य वृद्धाश्रम आणि हेल्थ सेंटर चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र मारुती जावळे.

मोबाईल नंबर : ८६९३०८४५५२.

श्री.सुभाष पाटील (आप्पा),आडोशी : ९८२३२९७७९७.


Comments

Popular posts from this blog