आवाज कोकणचा / प्रतिनीधी आशीष चौधरी


उलवे नोड सेक्टर 16 मध्ये बिल्डर कडून फसवणूक झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप.....



नवी मुंबई विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उरण पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून त्या मोबदल्यात साडेबारा टक्के विकसित भूखंड ही योजना राबवली या योजनेअंतर्गत मिळालेले भूखंड येथील शेतकऱ्यांनी विकसित करण्यासाठी बिल्डरांना दिले. अगोदर गोड बोलून शेतकऱ्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे करारनामे करून सिडको कडून भूखंड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कागदांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन सदर भूखंड प्राप्त करण्यात आले परंतु करारनाम्यामध्ये ठरलेल्या अटीप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला अथवा फ्लॅट न देता परस्पर हक्क पत्र घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.



 असेच एक उदाहरण सेक्टर 16 उलवे नोड येथे उघडकीस आले असून शेतकरी रवी ठाकूर यांनी त्यांचा 400 चौरस मीटरचा भूखंड नवी मुंबई स्थित अमन डेव्हलपर्स चे बिल्डर मनोज कुमार सिंग या बिल्डरला विकसित करण्यासाठी देण्यात आला.

 सदर भूखंडावर मनोज कुमार सिंग यांनी चार मजल्याची बिल्डिंग उभी केली व अगोदर ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या फ्लॅटच्या चाव्या त्यांच्या ताब्यात दिल्या परंतु काही कालावधीनंतर सदर बिल्डरने शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता सदर बिल्डींग मधील चार फ्लॅट परस्पर विक्री केल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले तसेच दोन दिवसांपूर्वी सदर मनोज कुमार सिंग हे आणखी एका नवीन गिऱ्हाईकाला दुकानाचा गाळा दाखवण्यासाठी आपल्या बॉडीगार्ड सह तिथे आल्याची खबर रवी ठाकूर यांना लागताच त्यांनी तातडीने तिथे धाव घेत सदर बिल्डरच्या विरोधात आक्षेप घेतला. यावेळी बिल्डर व शेतकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर शेतकऱ्यांने 112 या क्रमांकावर तक्रार दाखल केल्यानंतर सदर दोघांनाही न्हावाशेवा पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले होते. अशा प्रकारचे अनेक व्यवहार नवी मुंबई परिसरात घडले असून येथील गरीब शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत ही बिल्डर मंडळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आथिर्क शोषण व फसवणूक करत असल्याचे रवी ठाकूर यांनी म्हटले आहे .


लवकरच सिडको, नगर विकास मंत्री , गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना या बाबत निवेदन सादर करून मनोज कुमार सिंग याच्यावर योग्य कारवाई करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती सरकारला करणार असल्याचे व तरीही न्याय न मिळाल्यास मंत्रालयापुढे उपोषणास बसण्याचा मानस शेतकरी रवी ठाकूर यांनी केला आहे. 

Comments

Popular posts from this blog