आवाज कोकणचा / प्रतिनीधी

शैलेश ठाकूर 

कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल कामोठे येथे 7 जून रोजी कराटेचे  प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले.



त्यावेळी  दिनांक 4 जून रोजी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय सीनियर वर मास्टर स्पर्धेमध्ये रायगडच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 12 सुवर्ण पदक,11 रजत, 8 कास्य पदक व प्रथम उपविजेता चषक पटकावून  जिल्ह्याचे नाव  उंचावले.



 तसेच रायगड जिल्ह्यामधून कामोठे शहरातून रिताशा जयप्रकाश सुर्वे हिने म्युझिकल  फॉर्म मध्ये सुवर्णपदक,लाईट कॉन्टॅक्टमध्ये रजत पदक मिळवत पंजाब जालंदर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड निश्चित केल्यामुळे शाळेचे चेअरमन माननीय श्री. जयदास गोवारी सर, शाळेचे मुख्याध्यापक टी. एस. चाळके सर, आणि जनार्दन गोवारी सर, यांनी तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन करून  शुभेच्छा दिल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष व प्रशिक्षक शैलेश ठाकूर, रिताशा सुर्वे, पियुष धायगुडे तसेच कराटे टीमच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.


Comments

Popular posts from this blog