उरण पूजा चव्हाण
उरणकरनो तुम्ही खात असणारे चिकन सूरक्षीत आहे का ?
थंडी आणि उन्हाळा असा समिश्र मौसम त्यात लग्नसराइचा हंगाम त्यामुळे सध्या मटन आणि चिकन वर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत.परंतु आपल्या ताटांतील चिकान मटण कितपत सुरक्षित आहे ? याचे भान खवय्यांना नाही. नुकतेच महाराष्ट्रासह अन्य 9 राज्यात बर्डफ्लूने आपले फंख पसरवीले आहेत तर अन्य काही राज्यात पक्षी बर्डफ्लू च्या संसर्गाने मृत्यूमुखी पडत आहेत त्यामुळे कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.आज उरणात 250 पेक्षा अधिक चिकनची दुकाने आहेत या दुकानांवर स्थानिक आरोग्य संस्थेसह फूड सेफ्टी अँड स्टांडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया, अन्न व औषध प्रशासन पशुपालन विभाग स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी ढाराढूर झोपलेले आल्याने जनतेला नाईलाजाने आरोग्याला बधित करणारे चिकन मटन खवे लागत असल्यने जनते मधून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यात शहरत 150 ते 200 पेक्षा अधिक चिकनची दुक्ने आहेत तर 15 ते 20 मटणाची दुकाने आहेत,तर ग्रामिण भागात सर्वसाधारणपणे 1 मटणाचे तर 2 चिकनविक्रीची दुकाने आहेत या दुकानाची स्थिती पहिली तर कापण्याची पद्धत चिकन-मटण साफ करण्याची पद्धत दुकान अथवा टपरी मधील अस्वच्छता,कोंबड्या साफ करण्याची अस्वच्छ जागा,साफ करण्या साठी वापरण्यात येणारे अस्वच्छ पाणी,हे रोगराहीस निमंत्रण देणारे आहे.सर्व चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारानी आरोग्य विभाग,जिल्हा परिषद आणि तालुक्यांतील पंचायत समितीच्या पशुपालन विभागाचे नियम धाब्यावर बसविले आहेत.
अत्तातर देशांतील महाराष्ट्रासह 9 राज्यात बर्ड-फ्लू झाल्याचे निष्पन्न निघाले असल्याने बर्ड-फ्लू झालेल्या राज्यांतील कोंबडीचे मांस व अंडी खाण्यासव अन्य राज्यातविक्री करण्यास बंदी करण्यात आलेली आहे.इतकेच नाही तर चिकन पोल्ट्रीतील कोंबड्यांसह अन्य पदार्थ हाताळणी बाबत फूड सेफ्टी अँड स्टांडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने या साठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यामध्ये “कोंबडीचे मांस विक्री करणाऱ्यानी हातात ग्लोव्हज,तोंडाला मास्क लावणे, जागेची स्वच्छता राखणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा उरणात सर्वनियमव सूचना धाब्यावर बसून कोंबडीच्या मांसाची विक्री खुले आम सुरुतर आहेच परंतु टपरीत टाकण्यात आलेल्या कोंबडीची पिसे, पोटांतील घाण हे सारे रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर टाकून देण्यात येत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आजच्या स्थितीत ज्या प्रमणे कोरोना टेस्ट शिवाय डॉक्टरी इलाज करण्यात येत नाहीत. त्याच प्रमाणे प्रत्येक पोल्ट्री कडून कोंबड्या विकत घेणाऱ्या विक्रीत्याकडे बर्ड-फ्लू चा टेस्ट रिपोर्ट असल्या शिवाय कोंबडीचे मांस विक्री करण्यास मज्जाव करण्यात यावा अशी मागणी जनते मधून जोर धरू लागली आहे. तसेच हे कामही कोरोना व्हायरस प्रमाणे युद्ध पातळीवर पार पाडावे खवय्यांनी कोंडीच्या बॅचचे बर्ड-फ्लू टेस्ट रिपोर्ट तपासूनच कोंबडीच्या मांसाची अंड्यांची खरेदी करावी तरीही जिल्ह्यात कोंबड्या सूरक्षीत असल्याचा निर्वाळा देण्यासाठी खवय्यांकरिता मोफत चिकन खाद्य महोत्सव साजरे केले जात आहेत. काही असो अशा अनेक गोष्टीन मुळे चिकन खवय्यांनी आपली ताटांतील चिकन कितपत सूरक्षीत आहे,? याचा विचार मात्र जरूर करावा.
Comments
Post a Comment