पत्रकार उत्कर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न...
आवाज कोकणचा / प्रतिनीधी
पत्रकार उत्कर्ष समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न......
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या या सोहळ्यास मराठी मुद्रण परिषद महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब अंबेकर , मा. व्हि.. एस. म्हात्रे . निवृत्त सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मा.बाळासाहेब पाटील माजी राज्यमंत्री मा. म्हाडाअध्यक्ष, पनवेल महानगर पालिका माजी नगराध्यक्षा चारुशिला घरत, गायक दादुस संतोष चौधरी यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन करून दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रांत आयुष्य व्यतीत केलेले अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे व पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना जीवन गौरव पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले तर प्रिंट मिडियाचा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. लोकसत्ता चे हर्षद कशाळकर व इलेक्ट्रॉनिक मिडियाचा आदर्श पत्रकार एबीपी माझाचे दिपक पळसुले यांना देण्यात आला.
प्रशासकीय सेवेतील *कार्यक्षम अधिकारी* म्हणून रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप व नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.मिलींद भारांबे यांना प्रदान करण्यात आला.
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिनेश साळवी व सचिन होळकर यांना *अन्नदाता पुरस्काराने* गौरविण्यात आले.
सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग विष्णु चौगुले यांनी समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.
उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या राहुल हजारे व दिनेश हेगडे यांना युवा उद्योजक पुरस्कार देण्यात आला.
आरोग्य क्षेत्रात ग्रामीण व शहरी भागात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या पेण येथील गॅलक्सी हॉस्पिटल चे डॉ. रत्नदीप गवळी व उलवे नवी मुंबई येथील एकायन हॉस्पिटलला
बेस्ट हॉस्पिटल तर
*वैद्यक रत्न पुरस्कार डॉ. विदीत गौर* यांना प्रदान करण्यात आला.
आपली संस्कृती टिकून राहण्यासाठी भजन, कीर्तन व प्रवचन या माध्यमातुन समाजाचे प्रबोधन करणाऱ्या ह.भ.प. निवृत्ती बुवा चौधरी यांना भजन सम्राट व युवा प्रवचनकार ह.भ.प. मनोज महाराज ठाकुर यांना तर युवा किर्तनकार म्हणुन ह.भ.प. भास्कर महाराज कोळी यांना गौरवण्यात आले.
समाजामध्ये काही परिवर्तन करायचे स्री चा सन्मान राखला पाहिजे आणि आपल्या स्त्रिया किंवा महिला या आज वेगवेगळया क्षेत्रांत उंच भरारी घेऊन क्षितिजाला गवसणी घालत आहेत त्यांच्या या कार्याची पत्रकार उत्कर्ष समितीने दखल घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सात महिलांना *सप्तज्योती नारीशक्ती* पुरस्कार उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या सायली शाम ठाकुर , नृत्य क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या सुप्रिया वालणकर, प्रशासनात कार्यरत असून सुद्धा समाज सेवा करणाऱ्या सगीता चंद्रकांत पाटील, गायन क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या श्वेता सुरेश ठाकुर, समुपदेशक व कवयत्री सुचित्रा कुंचमवर, सौंदर्यतज्ञा विजयश्री भोपी व शिक्षण क्षेत्रातील ज्योत्स्ना सुधिर ठाकुर यांना नारी शक्ति पुरस्काराने गौरविण्यात आले.
बालवयात योग्य संस्कार करून खऱ्या अर्थाने देशाचे नागरीक घडवणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील चेतन रमेश ठाकरे व योगेश वंजी चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सत्याची वाटचाल वृत्तपत्राचे संपादक श्री गोविंद जोशी यांची कोकण विभाग कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करून पत्र देण्यात आले तसेच महिला उत्कर्ष समिती उलवे नोड पदाधिकारी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 24Live events चे संदेश पाटील यांनी केले
Comments
Post a Comment