विठ्ठल रुक्मिणी पायी पालखी सोहळ्याचे इंदापूर मध्ये जोरदार स्वागत
विठ्ठल रुक्मिणी पायी पालखी सोहळ्याचे इंदापूर मध्ये जोरदार स्वागत
आवाज कोकणचा/जगदीश महाराज सार्डेकर
पनवेल वरून निघालेली पालखीचे इंदापूर नगरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले पनवेल ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह भ प गणेश महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रमाणे यावर्षी पालखीच्या आयोजन करण्यात आले होते हा टप्पा पार करत असताना बऱ्याच ठिकानी पालखीचे स्वागत होत होते पालखी इंदापूर नगरीमध्ये प्रवेश केली पालखीमध्ये बरेच भाविक सहभागी झाले आहेत
या पालखीचे नियोजन उत्तम तसेच वस्तीचे ठिकाण हे व्यवस्थित उपलब्ध करून ठेवले होते असंख्य भाविक आज इंदापूर मध्ये दाखल झाले हे सर्व होत असतानाच ह भ प जगदीश महाराज सार्डेकर यांनी तुळशीबाग येथे कीर्तन सेवा दिली व त्या कीर्तन सेवेचा सर्व भाविकांनी लाभ घेतला.
Comments
Post a Comment