आरोग्य वारी_पंढरी च्या दारी "
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनची
"आरोग्य वारी - पंढरी च्या दारी "
आवाज कोकणचा/आरती पाटील
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ही नेहमी समाजहिताच्या कार्यासाठी अग्रेसर असते पंढरपूरच्या वारी साठी आलेल्या वारकऱ्यांसाठी पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.वैभव मोकल यांच्या अध्यक्षतेखाली गोपाळपूर पंढरपूर येथे आरोग्य शिबिर घेण्याचे ठरवण्यात आले त्यासाठी मागील आठवड्यापासून सर्व डॉक्टरांनी मेहनत केली.जे डॉक्टर वारी साठी येणार नव्हते त्यांनी शिबिरा साठी मेडिसिन देवून सहकार्य केले. शिबिरा साठी निघालेल्या गाडीला डॉ. गुणे सर,श्रीमती भारती नाईक व डॉ.वसंत पाटील यांनी श्रीफळ अर्पण करून,सर्व सेवाभावी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या व शिबिर पूर्णपणे यशस्वी करावे व त्याचा लाभ वारकऱ्यांना व्हावा असे मार्गदर्शन केले. व ते आज त्यांनी केलेली मेहनत पंढरपूरच्या वारीला आलेले वारकरी यांना आरोग्य सेवा देऊन सफल झाली. या शिबिरासाठी पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या महिला डॉक्टर सुद्धा उपस्थित होत्या असोसिएशनच्या दिलेल्या सेवेबद्दल सर्व वारकरी समाजातून आभार मानण्यात आले आहे तरी यावेळेस पनवेल पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉ.वैभव मोकल डॉ. रवींद्र राऊत डॉ. संदेश बहाडकर डॉ.सागर ठाकूर, डॉ. राजेंद्र पटेल
डॉ. दीपक पूकाळे डॉ. विजय देवकाते , विजय कदम यांच्या सर्वांच्या मेहनतीने आरोग्य वारी पंढरीच्या दारी संपन्न झाली.
Comments
Post a Comment