आवाज कोकणाचा / प्रतिनीधी
जगदिश क्षीरसागर - पनवेल
सेंट मेरी शाळा सुकापुर समोरील उघड्या गटारामुळे पालक वर्ग चिंतेत
नवीन पनवेल येथील सेंट मेरी शाळा ही सुकापुर ग्रामपंचायत हद्दीत येते, या शाळेसमोरून एक मोठा नाला वाहतो. तेथे शाळा भरतेवेळी व शाळा सुटते वेळेस पालक वर्गाची खूपच गर्दी होते. दरवर्षी पावसाळ्यात या गटारात पडून पालक व विद्यार्थी जखमी होतात बाजूलाच पनवेल माथेरान हा रहदारीचा रस्ता आहे.
शाळा सुटल्यानंतर पालक मुले नेण्याकरता शाळेसमोर येतात तेव्हा त्यांची अवस्था इकडे विहीर तिकडे आड असे होते; का तर पुढे गेले तर गटारात पडायची भीती मागे थांबलं तर वाहनांने अपघात होण्याची भीती. येथे सारखे लहान-मोठे अपघात होत असतात म्हणून सर्व पालकांनी ही बाब शाळेच्या निदर्शनास आणून दिले पण काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पालकांनी ही बाब मनसेचे सुकापुर विभागीय अध्यक्ष राज क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा मनसे विभाग अध्यक्षांनी शाळा प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी चर्चा केली पण आतापर्यंत काहीही तोडगा निघाला नाही.
शाळेला उन्हाळी सुट्टी होती तेव्हा काम करून घ्यायला हवे होते पण आतापर्यंत काहीही काम झाले नाही. शाळा प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहेत का? असे पालक वर्गातून बोलले जाते. म्हणून आता राज क्षीरसागर यांनी दोन्ही प्रशासनास कडक शब्दात इशारा दिला आहे की जर पावसाळ्यापूर्वी गटार दुरुस्त झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व कार्यकर्त्यांना घेऊन जोरदार आंदोलन करेल. यावेळी पाली देवद सुकापुर विभागाचे अध्यक्ष राज क्षीरसागर यांच्यासोबत सुकापुर शाखा अध्यक्ष जयवंत बाबरे आणि मनसे सैनिक किरण गावडे यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते हजर होते.
Comments
Post a Comment