आवाज कोकणचा
उरण ( प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून )
श्रेया भोसले शालांत परीक्षेत उरण मधून प्रथम
कॉलेजकट्टा.....
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयता 10 च्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत 95 टक्के गुण मिळून कु.श्रेया नारायण भोसले केवळ सेंट मेरी विद्यालय जेएनपीटी मधून प्रथमआली असून ती तालुक्य मधूनही प्रथम येण्याचा मान तिने पटकाविला आहे.
.मूळ सोलापूर तालुक्यांतील राहणारी श्रेया भोसले आपल्याआई वडिलांसोबत उरण येथे राहत आहे. वडील नारायण भोसले हे पेशाने ब्रदर म्हणून जेएनपीटी रुग्णालयात काम करीत आहे तर आई ही शासकीय सेवेत परिचारिका म्हणून कार्यरत आहे.घरात आई वडील दोन्हीही उच्चशिक्षीत असल्याने श्रेयाला घरातूनच चांगले मार्गदर्शन मिळाले मुळातच अभ्यासात हुशार असल्याने सेंटमेरी विद्यालयांतील शिक्षकांनी सुरवाती पासूनच तिला चंगले मार्गदर्शन केले त्याच बरोबर ती जात असणाऱ्या अग्रवाल क्लासेसच्या शिक्षकानी तीच्या अभ्यास कडे जातीने लक्ष दिले परिणामी श्रेया भोसले हिने चिकाटीने आणि नियोजन पद्धतीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून ती इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असतानाही संस्कृत सारख्या विषयात तिने 98 गुण तर गणितात 95 गुण मिळविले आहेत अशाप्रकारे कु.श्रेया ही सेंट मेरी विद्यालाय जेएनपीटी मधून प्रथम तर आलीच परंतु उरणतालुक्यांतून प्रथम येण्याचा मानाही तिला मिळाला असल्याने तालुक्यांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment