आवाज कोकणचा / शैलेश ठाकुर
दुसरी जिल्हास्तरीय वोविनाम असोसिएशन स्पर्धा करंजाडे येथे संपन्न
रविवार दिनांक 9/7/2023 ॲकॅडमी ऑफ मार्शल आर्ट संलग्न वोविनाम असोसिएशन तर्फे दुसरी जिल्हास्तरीय निवड स्पर्धा नुकतीच करंजाडे (पनवेल) येथे यशस्वीरित्या पार पडली.
वोविनाम असोसिएशन चे रायगड जिल्हाअध्यक्ष विशाल झेंडे व प्रथम जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमा प्रसंगी मा. मनोहर पनवेलकर, मा. रमेश तुपे, तसेच मा.अमोल ठोत या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
य स्पर्धेसाठी पनवेल, करंजाडे कामोठे, खारघर येथील तब्बल 227 खेळाडूंनी सहभाग घेऊन 68 सुवर्ण, 63 रजत, 71 कांस्य पदकांची कमाई केली. सदर स्पर्धा मुले-मुली सब ज्युनियर, ज्युनियर,कैडेट, सिनियर वयोगटात पार पडली.
अकॅडमी ऑफ मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.अक्षय अमोल जाठोत याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय सेन्साई अक्षय जाधव, पूजा जाधव व सर्व प्रशिक्षकांना देण्यात आले. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, साप्ताहिक आवाज कोकणचा चे संपादक डॉक्टर वैभव पाटील,तसेच इंडियन मार्शल आर्ट्स शितो-रियो फेडरेशन चे उपाध्यक्ष , पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र खजिनदार व आवाज कोकणचा चे प्रतिनिधी शैलेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment