पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून डॉक्टर्स डे उत्साहात साजरा
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून डॉक्टर्स डे उत्साहात साजरा
पनवेल/आरती पाटील
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून मानघर येथील छाया रिसोर्ट मधील सभागृहात डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कामगार नेते तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत, पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल, ए ओ सी चे डॉ सलील पाटकर, महाराष्ट्र होमिओपॅथिक कॉन्सिल सदस्य डॉ आशीष भगत, डॉ सौ प्रज्ञा कापसे, सिनेट सदस्याडॉ विनोद चव्हाण, महामुंबई चे संपादक मिलिंद खारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.यानंतर संघटनेच्या डॉक्टर्स ना संघटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ देण्यात आली.प्रास्ताविकामध्ये संघटनेचे अध्यक्ष डॉ वैभव मोकल यांनी सांगितले की 7 डॉक्टर्स एकत्र येऊन पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनची स्थापना केली.प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम केल्याने आज संघटनेमध्ये 250 डॉक्टर्स आहेत.या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर, कौटुंबिक स्नेहसंमेलन,प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण, वार्षिक क्रीडा स्पर्धा,1 जुलै रोजी डॉक्टर्स डे ,70 CME, हळदीकुंकू आदी उपक्रम हे आपल्या संघटनेतील डॉक्टर्स व त्यांच्या परिवारासाठी राबविले जातात. सामजिक कार्यासाठी आरोग्य शिबीर व निसर्ग वाढीसाठी वृक्षारोपण केले जाते.या वेळेस प्रथमच आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे एक हजार रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधे दिली.या तपासणी झाली यावर्षी 20 डॉक्टर्स गेले होते पुढील वर्षी 50 जण जातील अशी घोषणा करताच उपस्थित डॉक्टरानी टाळ्यांचा कडकडाट केला. या संघटनेचे कार्यालय पनवेल मध्ये विश्राळी नाका येथे आहे.डॉ सलील पाटकर यांनी कर्करोगासंबंधी औषधोपचार , उपाय याबद्दल अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले की तुम्हा डॉक्टर मधून कोणीतरी आरोग्य मंत्री व्हावे ही माझी इच्छाआहे. यावेळी संघटना कशी चालवावी याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. चांगले काम करीत असलेल्या या संघटनेचे कौतुक करून पुढील डॉक्टर्स डे साठी खांडस ता कर्जत येथील त्यांचा फार्म हाऊस देण्याचे जाहीर केले.यावेळी होमोपॅथी अँड मेम्बर ऍकॅडमीक कोन्सिल MUHS चे डॉ आशिष भगत आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक च्या सेनेट सदस्या डॉ सौ प्रज्ञा कापसे यांना सन्मानित करण्यात आले.डॉक्टर्स डे निमित्ताने केक कापण्यात आला. आणि सर्व डॉक्टरांना बी पी चेक करण्याचे मशीन देण्यात आले. अध्यक्ष डॉ वैभव मोकल यांच्या आणि डॉक्टर्स कमिटीच्या व्यवस्थित नियोजनाने डॉक्टर्स डे उत्साहात साजरा झाला तसेच यामध्ये प्रामुख्याने
डॉ. रवींद्र राऊत डॉ. संदेश बहाडकर ,डॉ. सागर चौधरी, डॉ. सिद्धार्थ कौशिक,डॉ.सागर ठाकूर डॉ.सचिन पाटील डॉ. सुदर्शन मेटकर डॉ. गजेंद्र शिलिमकर डॉ अनघा चव्हाण,या सर्वांची मेहनत दिसून आली.
Comments
Post a Comment