आवाज कोकणचा / शैलेश ठाकुर
पोर्तुगाल येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जासईच्या शुभम म्हात्रे ची निवड
उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र शुभम म्हात्रे याची डिसेंबर महिन्यात पोर्तुगाल येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे.
दिनांक1/7/2023 ते 5/7/2023रोजी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे पार पडलेल्या नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र रायगडच्या वतीने खेळताना शुभम म्हात्रे उरण जासई ( सुवर्ण पदक ), यश जोशी पेण दादर ( रजत पदक ), रिताशा सुर्वे पनवेल कामोठे ( कास्य पदक ), भावना मनाली उरण ( कास्यपदक ), आदित्य ठाकूर, आकाश भिडे, केवल मोकळ या सर्वांनी महाराष्ट्र रायगड मधून सहभाग घेतला होता. त्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.
या अगोदरही या सर्वांनी वेगवेगळ्या स्पर्धेमधून अनेक मेडलची कमाई करून आपलं गाव तालुका आणि जिल्ह्याचे नाव उंचावलं आहे. त्यांच्या या यशामुळे पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, आवाज कोकणचा चे संपादक वैभव पाटील, इंडियन मार्शल आर्ट्स शितो-रियो फेडरेशनचे प्रशिक्षक शैलेश ठाकूर या सर्वांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
Comments
Post a Comment