आवाज कोकणचा / प्रतिनीधीउ
उरण
महिला उत्कर्ष समितीने केले वृक्षारोपण
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड आणि नवी मुंबई विभागातर्फे आज उरण येथील निळकंठेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून याच परिसरात केलेले वृक्ष आज खूप छान वाढ झालेले दिसले .
या मंदिर परिसरात दररोज शेकडो शिवभक्त येत असतात आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवाला साकडे घालत असतात. सध्या या परिसरात उरण रेल्वे स्टेशनचे काम चालू असल्यामुळे भाविकांना निवारा तसेच सावलीची व्यवस्था नाही .
हा परिसर शांत व भक्तिमय असून भक्तांना सावली मिळावी तसेच परिसर सुशोभित व्हावा याकरिता पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अध्यक्ष सौ रेखा घरत , नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्यासह उरण तालुका अध्यक्ष निर्मला पाटील, योगसाधना पाटील, आश्रया शिवकर, भारती कांबळे, रंजना पाटील, उज्ज्वला तांडेल, लक्ष्मी घरत, सपना शिंदे, वृषा मराठे सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बोलताना रेखा घरत म्हणाल्या की आज जे वृक्षारोपण झाले आहे त्यांचे संगोपन होऊन वाढ होण्याच्या दृष्टीने आपल्या सहकारी महिला भगिनिंसह त्या स्वतः निगा राखतील.
Comments
Post a Comment