आवाज कोकणचा / उरण प्रतिनिधी 

महिला उत्कर्ष समितीकडून मणिपूर बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याची मागणी

पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ रेखा घरत, प्रदेश सचिव ॲडडवोकेट दिव्या लोकरे यांनी मणिपूर येथे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा ज्यामध्ये तेथील दोन समुदायांमध्ये झालेल्या वादानंतर काही महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची विवस्रावस्थेत धिंड काढण्यात आली होती .

 हे कृत्य अतिशय लज्जास्पद, घृणास्पद व मानव जातीला काळीमा फासणारे आहे. याचा निषेध करण्यासाठी महिला उत्कर्ष समितीने आपल्या सदस्यांसह उरण येथील गांधी चौकामध्ये निषेध मोर्चा काढून निदर्शने केली. 

अत्याचारित महिलांना न्याय मिळण्यासाठी सरकारने जलद गती न्यायालयात हा खटला चालवून दोषी आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी उरणचे तहसीलदार श्री. उद्धव कदम व उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 


निषेध मोर्चामध्ये नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे, सदस्या सौ रंजना पाटील, सरिका पाटील यांच्यासह अनेक महिला व सदस्य पदाधिकारी उपस्थित होत्या. 


महिला उत्कर्ष समितीमध्ये सामील होण्यासाठी 7977996992 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Comments

Popular posts from this blog