आवाज कोकणचा / आशिष चौधरी

ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग तर्फे संभाषण कौशल्य आणि निवेदन कार्यशाळेचे आयोजन...

समाजातील शिक्षक विद्यार्थी व्यावसायिक कलाकार गायक नोकरदार गृहिणी कॉर्पोरेट डॉक्टर राजकारणी आणि प्रभावी बोलू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ऑगस्ट मीडिया आणि ट्रेनिंग यांच्यातर्फे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .


या बाबत बोलताना संस्थेच्या प्रमुख डॉ . मृण्मयी भजक म्हणाल्या की कार्यशाळेत अधिकाधिक लोकांनी सहभाग घेऊन आपले वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी सहभाग घ्यावा . 

डॉ. मृण्मयी भजक या स्वतः रेडिओ, टिव्ही आणि स्टेज निवेदिका असून उत्कृष्ठ सुसंवादक आहेत. रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी दुपारी 12 ते 7 या वेळेत  पू. ल. देशपांडे कला अकादमी 3 रा मजला रविंद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून 


मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई चे उपाध्यक्ष श्री. आशिष चौधरी यांच्या मालकीचे नवी मुंबई उलवे न्यूज चॅनेल या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत. 

Comments

Popular Posts