पेण तालुक्यातील कासू विभागातील शेती गेली पाण्याखाली

 पेण तालुक्यातील कासू विभागातील शेती गेली पाण्याखाली  



नुकसान शेतीचे केले पंचनामे



पेण/अरुण चवरकर

         पेण तालुक्यातील कासू विभाग हा कोकणचा हिरवा पट्टा म्हनून ओळख कोकणात जाताना जी हिरवीगार भातशेती दिसते तो म्हणजे कासू विभाग कासू,पाटणी,पांडापूर , बुर्डी रायगड जिल्ह्यात सतत आठ दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे , त्यामुळे भातशेती कुजून गेली आहे.

          आज दिनांक २७/०७/२०२३रोजी कासु, बूर्डी,पांडापूर, पाटणी या खाडीतील शेतीची प्रत्येक्ष कासु ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.के.पाटील, कृषी सहायक अर्चना वागदरे,कासू ग्रामपंचायतीचे सदस्य नवज्योत तांडेल,नयन म्हात्रे , रामचंद्र तांडेल, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रत्येक्ष  नूकसान शेतीची पाहणी करून पंचनामे केले मोठ्या प्रमाणावर शेतीची नूकसान झाली असून लवकरात लवकर शासनाने द्यावी ही अपेक्षा शेतकऱ्यांना असुन लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवं असे मत शेतकरी व  उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.



Comments

Popular posts from this blog