आवाज कोकणचा / पुजा चव्हाण

स्वगीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद.



उरण मधील रायगड जिल्हा पातळीवरील चमकलेले प्रसिद्ध कबड्डीपटू स्वगीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दिनाकं ३० जुलै २०२३रोजी स्वर्गीय अश्विन पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे सभागृहात रक्तदान शिबीर केली होती.आयोजित रक्तदान शिबिरास उरण तालुक्यातील नागिरीकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरास उरण चे मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, या शिबिरात 137 रक्तदात्यानी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अश्विन पाटील मित्र परिवाराने आभार मानले आहेत



या शिबिरास उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, मा शहर संघटक श्री प्रवीण मुकादम, उद्योगपती तेजाब मस्के, श्री योगेश गोवारी, श्री पाटील साहेब उपस्थित होते.



सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उरण उपशहरप्रमुख व स्वगीय अश्विन पाटील क्रीडा, सामाजीक व शैक्षणिक संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते श्री गणेश पाटील, श्री तुषार पाटील, पप्पू सूर्यराव, सिद्धार्थ मसुरकर, मयुरेश पाटील, वैभव तांडेल, धनेश माळगावकर व स्वर्गीय अश्विन पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog