आवाज कोकणचा / मुंबई
आशिष चौधरी
ऑगस्ट मीडिया आणि ट्रेनिंग संस्थेची संभाषण कौशल्य निवेदन कार्यशाळा संपन्न
पु ल देशपांडे कला अकादमी दादर येथे ऑगस्ट मीडिया आणि ट्रेनिंग या संस्थेच्या प्रमुख डॉ. मृणाली भजक यांनी निवेदन आणि संभाषण कौशल्य यामध्ये आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या समाजातील सर्व घटक जसे डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते , महिला, युवा यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते .
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, नवी मुंबई उलवे न्यूज चे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई उपाध्यक्ष श्री आशिष चौधरी आणि पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाल्यानंतर डॉ. मृण्मयी भजक यांनी प्रत्यक्ष कार्यशाळेला सुरुवात केली.
यावेळी उपस्थितांना संभाषणातिल बारकावे समजावून सांगत प्रात्यक्षिके करवून घेतली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली ही कार्यशाळा उपस्थिताना योग्य मार्गदर्शन व शिकवण्याची सुलभता यामुळे ही कार्यशाळा खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले .
तसेच यातून अधिक ज्ञान मिळण्यासाठी पुढील प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मत अनेक उपस्थितानी केले.
Comments
Post a Comment