आवाज कोकणचा / ज्योतीका हरयान 

महिला उत्कर्ष समितीने केली  मणिपूर बलात्कार प्रकरणातील  आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी



पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्षा सौ. ज्योतीका हरयान यांच्यासह कुडाळ तालुका अध्यक्षा सौ . दिपा ताटे, सचिव तन्वी सावंत, सुश्मिता राणे, स्वरदा खांडेकर, रुपाली वारक यांनी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल यांना  निवेदन दिले.



मणिपूर राज्यात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमध्ये तेथील दोन समुदायांत झालेल्या वादानंतर स्थानीक  महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची विवस्रावस्थेत धिंड काढण्यात आली होती . हे कृत्य अतिशय बीभत्स , लज्जास्पद, घृणास्पद आहे .

अशी घटना पुन्हा घडू नये व असली कृत्य करण्यास पायबंद बसावा व अत्याचारग्रस्त पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी सरकारने जलद गती न्यायालयात हा खटला चालवून दोषी आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्यात  यावे अशी मागणी करत हे निवेदन देण्यात आले.

         ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

महिला उत्कर्ष समितीमध्ये सामील होण्यासाठी 9890278313 / 7977996992 या क्रमांकावर संपर्क साधावा.

            ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


Comments

Popular posts from this blog