आवाज कोकणचा / पुणे
गणेश कांबळे
पीएमपीएलच्या बेशिस्त चालक व वाहकांची तक्रार केल्यास प्रवशाला मिळणार १०० रुपये बक्षीस
पुणे : दि. १८. पुण्यातील पीएमपीएलच्या बसने प्रवाशी प्रवास करतांना बसच्या चालकाच्या व वाहकांच्या बेशिस्त पणाला सामोरे जावे लागते. याचा त्रास अनेक प्रवाशांना सहन करावा लागतो. पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांना नेहमीच चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र चालक व वाहकांच्या बेशिस्तपांमुळे काही प्रवाशी बसने प्रवास करणे टाळतात. यामुळे पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी चालक व वाहकांच्या वर्तनात सुधारणा व्हावी याकरिता एक नवीन योजना सुरू केली आहे. पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी सर्वात पहिला बस चालक व वाहकांना शिस्त लावण्यासाठी सुरु केला. त्यानी स्वत: बसने सामान्या प्रवाशांप्रमाणे बसने प्रवास केला. तेव्हा त्यांचा लक्षात आले. बस हि बस स्थानकावर न थांबविता चालक व वाहक पुढे निघून जातात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. प्रवाशांनी प्रवास करताना बेशिस्त चालक व वाहकाची तक्रार पुराव्यानिशी केल्यास प्रवाशाला १०० रुपये बक्षीस देण्याचा येईल. तसेच बसच्या चालक व वाहकावर कारवाई करण्यात येईल. असेही पीएमपीचे अध्यक्ष सिंह म्हणाले.
Comments
Post a Comment