आवाज कोकणचा / शैलेश ठाकुर
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
दिनांक 28 ते 30 जुलै राजाराम भिकू पाठारे स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फारूक सुलेमानी स्पोर्ट डायरेक्टर आणि कोच इराण , सुरेंद्र पठारे उद्योजक व समाजसेवक, यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभली होती. स्पर्धेसाठी रायगड, मुंबई सिटी, मुंबई सबब, अकोला,अमरावती,अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया, भंडारा,जळगाव,कोल्हापूर, मालेगाव,लातूर, नागपूर,नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, पिंपरी चिंचवड, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, वासिम, या सर्व ठिकाणाहून १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रायगडच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ७ सुवर्ण, १५ रजत, ३२ कास्यपदक मिळून चांगली कामगिरी पार पाडली. किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा चे अध्यक्ष श्री. निलेश शेलार सर आणि सेक्रेटरी श्री.धिरज वाघमारे सर यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धेचे आयोजन केले होते. मार्गदर्शक व कोच म्हणून जीवन ढाकवल , शैलेश ठाकूर , संतोष मोकळ , दीपक घरात , जिग्नेश म्हात्रे, राजेश कोळी, केदार म्हात्रे,, शुभम म्हात्रे,यश जोशी, कनकेश गावंड, केवल मोकल, आकाश भिडे, सानिका ठाकूर, रिताशा सुर्वे या सर्वांनी महत्त्वाची भूमिका निभावली......पनवेल मधून अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दिव्या पाटील क्रिएटिव्ह वेपन्स सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्ट रजत , पियुष धायगुडे रजत, ऋतुजा माळी रजत, सोनाली केवट कास्य, धनश्री डाखोरे कास्य पदक मिळवून हर्षद पाटील,प्रांजल हाडवळे, रुद्र पाटील, अर्णव जाधव, प्रियांका रस्कोती, सर्वेश म्हात्रे, हे सर्व सहभाग पत्राचे मानकरी ठरले.
किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष श्री. सुधाकर घारे,कार्याध्यक्ष श्री.मधुकर घारे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे, सचिव डॉ वैभव पाटील. यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वैभव पाटील.
Comments
Post a Comment