आवाज कोकणचा / पनवेल
शैलेश ठाकूर
*दुसरी राज्यस्तरीय व्होविनाम स्पर्धा करंजाडे पनवेल येथे यशस्वीरित्या संपन्न *
A.M.A द्वारे आयोजित *दुसऱ्या राज्यस्तरीय व्होविनाम स्पर्धेचे आयोजन पनवेल(रायगड) विभागातील करंजाडे टर्फ येथे शनिवार,, रविवार दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2023.रोजी करण्यात आले होते.
*व्होविनम खेळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.संतोष बाबुराव खंदारे सर* आणि *व्होविनम महाराष्ट्राचे सचिव श्री.विनोद कुंजीर सर* यांच्या उपस्थितीत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
* या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व उद्घाटन समयी करंजाडे स्थानिक सरपंच श्री मंगेश शेलार व हार्दिक गोकांनी साहेब यांची विशेष उपस्थिती होती.
रायगड व्होविनमचे जिल्हाध्यक्ष श्री. अक्षय जाधव सर,विशाल झेंडे सर आणि त्यांच्या टीमने केलेले प्रयत्न, व्यवस्था उल्लेखनीय होती. रायगडच्या वतीने रेफ्री म्हणून सानिका ठाकूर, प्रसाद साळुंखे, सुजित दळवी, पियुष धायगुडे,प्रथम जाधव, मानसी गोरे, स्नेहल धुमाल, रोशनी जोगदंड, पांडुरंग अलदार, अमर मिसाळ या सर्वांचा स्पर्धेसाठी मोलाचे योगदान होते.
या स्पर्धेत 18 जिल्ह्यांपैकी 362 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते . त्यामध्ये रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत
36 सुवर्णपदके
43 रौप्य पदके.
आणि 25 कांस्यपदके मिळवत रायगड चे नाव उंचावले. त्या स्पर्धेचे आयोजन व रायगडला मिळाले मेडल यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, आवाज कोकणचा चे संपादक डॉ. वैभव पाटील तसेच पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र खजिनदार व आवाज कोकणचा चे प्रतिनिधी शैलेश ठाकूर या सर्वांनी टीमचे विशेष कौतुक करत गुहाटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment