आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे
ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळ तर्फे आदिवासी बांधवांना विविध दाखल्यांचे वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळचे धडाडीचे सरपंच श्री सदाशिव वास्कर यांच्या अभिनव संकल्पनेतून ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बंधू भगिनी तसेच विभागांतील इयत्ता दहावी व बारावी मध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गावचे आराध्य श्री राधाकृष्ण मंदिर येथे थाटामाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पनवेल तालुक्याचे तहसीलदार श्री विजय पाटील , वरिष्ठ पत्रकार माधव पाटील, पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , नवी मुंबई उलवे न्यूज चे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई उपाध्यक्ष आशिष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नंदराज शेठ मुंगाजी , ओवळे मंडळ अधिकारी मच्छिंद्र मोहिते. पत्रकार सुनील कटेकर यांच्यासह विभागातील वरिष्ठ नागरिक व समाजसेवक उपस्थित होते.
गावच्या विकासाची सतत काळजी करणाऱ्या श्री सदाशिव वास्कर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी संजय बडे यांनी वेगळा उपक्रम राबवत आरोग्य शिबोराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये विशेषतः महिलांप्रती त्यांचा असलेला आदर व आरोग्य विषयक दृष्टिकोन दिसून आला.
दृष्टी हॉस्पिटल व मातोश्री धमके हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला वर्गासाठी संपूर्ण रक्त तपासणी कोलेस्ट्रॉल थायरॉईड डायबिटीस यासारख्या तपासण्या मोफत आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच महिला वर्गासाठी अत्यंत काळजीची किंवा जीवघेणी ठरणारी अशी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी पॅक स्मिअर मोफत ठेवण्यात आली होती या तपासण्यांचा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास शंभरहून अधिक महिलांनी लाभ घेतला.
यावेळी बोलताना श्री वास्कर यांनी गावाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतानाच येथील आबाल वृद्ध तसेच विद्यार्थी व महिला या समाजाच्या कणा असून त्या सुदृढ असाव्यात यासाठी या आरोग्य शिबराचे आयोजन केल्याचे म्हणाले तसेच विभागातील विद्यार्थी भविष्यात गावाचे नाव उज्वल करतील यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले व योग्य दर्शन मार्गदर्शन मिळाले तर भविष्यातील जागरूक नागरिक घडेलच परंतु देशाच्या जडणघडणीत ही त्यांचा हातभार लागेल असे मत मांडले.
श्री वास्कर यांची ही दूरदृष्टी ग्रामपंचायतला भविष्यात उच्च स्थानी येईल तसेच विभागात या ग्रामपंचायतीच्या कामाचा आदर्श इतर लोकही घेतील असा विश्वास डॉ. अशोक म्हात्रे यांनी व्यक्त केला.
अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जोपासणारी कामे नेहमीच व्हावी तसेच ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्वांना याचा फायदा मिळावा यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा श्री वास्कर यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment