आवाज कोकणचा / पनवेल
अशोक म्हात्रे
आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य व पनवेल तालुका आदिवासी संघटना आयोजित जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा
9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन. या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्य संस्थापक मधुकर वाघ , महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास वाघ, उपाध्यक्ष मामा कातकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी संघटना पनवेल यांनी पनवेल तालुक्यातील वावंजे येथे शानदार सोहळ्याचे आयोजन केले होते.
पनवेलचे तहसीलदार विजय पाटील, गावचे सरपंच डी . बी. म्हात्रे, पत्रकार उत्कर्ष समिती संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, वनाधिकारी सागर अवघडे , पनवेल न्यायालयाचे बबन साळवी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाटील , पत्रकार उत्कर्ष समिती खजिनदार शैलेश ठाकूर ह भ प कृष्णाजी पवार , पनवेल तालुका संघटना अध्यक्ष भगवान कातकरी आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित रायगड जिल्ह्यातून उपस्थित सर्व आदिवासी बंधू भगिनींनी गावातून फेरी काढून जनसामान्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले विचार प्रकट केले ज्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी युवक युवतींनी शिक्षणावर अधिक भर देऊन नव्या प्रवाहात सामील व्हायचे आवाहन केले.
यावेळी जिल्ह्यातून उपस्थित युवक युवतींनी आपली आपली पारंपारिक संस्कृती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित जेष्ठ आदिवासी बंधू भगिनींना सन्मानित करण्यात येऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.
Comments
Post a Comment