आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे
पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबईची तोफ थंडावली आशिष चौधरी काळाच्या पडद्याआड...
पत्रकार उत्कर्ष समितीचे नवी मुंबई उपाध्यक्ष तथा नवी मुंबई उलवे न्यूजचे संपादक आशिष चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.
जनमानसात वेगळी छाप असणारे व न डगमगता सडेतोड पत्रकारिता करणारे आशिष चौधरी हे नवी मुंबईमध्ये एक प्रचलित नाव होते . अनेक छोट्या छोट्या विषयांवर सखोल अभ्यास करून त्याची व्यवस्थित मांडणी करत पीडित अन्यायग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव क्रियाशील असत .
त्यांच्या अकस्मात मृत्यूने पत्रकारिता क्षेत्राला मोठे खिंडार पडले आहे .
नमस्ते दोस्तो जी हा मै हु जनता का दोस्त और आपका होस्ट आशिष चौधरी अशा भारदस्त आवाजात सुरुवात करणारे आशिष चौधरी हे अल्पावधीत उलवेकरांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment