आवाज कोकणचा / नवी मुंबई
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महिला उत्कर्ष समिती उलवे चा ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्या सहकार्याने
महिला उत्कर्ष समिती उलवे नोड अध्यक्ष विनश्री कदम यांनी प्रदेश सचिव एडवोकेट दिव्या लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमिला सातपुते, ललिता बने, जयश्री पावशे, वृषाली पेडणेकर , जयश्री पाखरे, प्रमिला साने , कांचन यांच्यासह विभागातील अनेक महिला भगिनींनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विभागातील महिलांना एकत्र आणून वर्षा लोकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी व ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला व समाजाप्रती आपले देणे वृक्षारोपणाच्या माध्यमातून व्यक्त करत प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन केले
.
Comments
Post a Comment